Face Care Tips: केमिकलयुक्त टोनरपेक्षा बीटपासून घरीच बनवा नैसर्गिक टोनर

बीटरूट ही एक अशी भाजी आहे ज्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक आढळतात.
Face Care Tips:
Face Care Tips:Dainik Gomantak

टोनरचा वापर हा चेहरा चांगला दिसावा यासाठी केला जातो. त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवण्याचे काम करते. त्वचा स्वच्छ करते आणि त्वचेच्या छिद्रांना मोकळे करते. त्वचेला तेलमुक्त ठेवण्याचे आणि मृत पेशी दुरुस्त करण्याचे काम करते.

त्यामुळे बाजारात याला जास्त मागणी आहे. यामुळेच चांगल्या ब्रँडची उत्पादने खूप महाग असतात आणि त्यात अशी रसायने वापरली जातात. ज्यामुळे त्वचेला हानी पोहोचते. टोनरची गरज भागवण्यासाठी तुम्ही ते नैसर्गिकरित्या बनवू शकता.

अशा अनेक भाज्या आणि वनस्पती आहेत. ज्यांच्या मदतीने चेहरा सुंदर बनवता येतो, त्यापैकी एक आहे बीटरूट. ही एक भाजी आहे ज्यामध्ये लोह, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेसाठी चांगले मानले जाते.

  • टोणर बनवण्यसाठी लागणारे साहित्य

7 ते 10 चमचे बीटरूट रस

3 टेस्पून डिस्टिल्ड वॉटर

कृती

टोनर बनवण्यासाठी प्रथम बीटरूट सोलून घ्यावे. त्याचे तुकडे करावे.

ब्लेंडरमध्ये चांगले बारिक करून घ्यावे.

आता हे मिश्रण करून घ्या, त्यानंतर पातळ कापडाच्या मदतीने गाळून घ्या.

आता हा रस एका काचेच्या स्प्रे बाटलीत टाका.

यानंतर, त्यात डिस्टिल्ड वॉटर घाला आणि मिक्स करा.

दररोज रात्री तुमची त्वचा स्वच्छ केल्यानंतर टोनरने तुमच्या चेहऱ्याला ताजेपणाची अनुभूती द्या

बीटरूट आणि एलोवेरा जेलसह बनवा टोणर

टोणर बनवण्यासाठी लागणारे साहित्य

दोन चमचे बीटरूट रस

अर्धा टीस्पून एलोवेरा जेल

बदाम तेलाचे काही थेंब

कृती

बीटरूट धुवावे, सोलून घ्या आणि चिरून घ्यावे.

आता ब्लेंडरमध्ये थोडे पाणी आणि बीटरूट घालून बारिक करावे,

आता तयार रस एका पातळ कापडाने गाळून घ्या, एका भांड्यात ठेवा.

आता त्यात एलोवेरा जेल आणि बदाम तेलाचे काही थेंब घाला.

हे मिश्रण नीट मिसळा. तुमचे टोनर तयार आहे.

स्प्रे बाटलीत ठेवा रात्री झोपण्यापूर्वी टोनर त्वचेवर लावावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com