व्हाट्सअ‍ॅपवर दररोज किती मॅसेज पाठवले जात असतील बरं?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

एका अहवालातील माहितीनुसार ऑक्टोबरपर्यंत व्हाट्सअ‍ॅपवर 200 कोटी सक्रिय वापरकर्ते होते. जानेवारीमध्ये अँड्रॉईड उपकरणांवर व्हाट्सअ‍ॅप हे ५०० कोटींहून अधिकदा डाऊनलोड केले गेले आहे.

नवी दिल्ली- मार्क झुकरबर्ग यांच्या मालकीच्या असलेल्या व्हाट्सअ‍ॅपवर दररोज एक हजार कोटींहून अधिक संदेश पाठवण्यात येतात. या संदर्भात व्हाट्सअ‍ॅपचे मालक मार्क झकरबर्ग यांनी ही माहिती देताना दररोज 250 कोटींहून अधिक लोक व्हाट्सअ‍ॅप आणि फेसबूकचे इतर अ‍ॅप्सही वापरतात, असेही त्याने सांगितले.

कितीवेळा केले आहे डाउनलोड?  

एका अहवालातील माहितीनुसार ऑक्टोबरपर्यंत व्हाट्सअ‍ॅपवर 200 कोटी सक्रिय वापरकर्ते होते. जानेवारीमध्ये अँड्रॉईड उपकरणांवर व्हाट्सअ‍ॅप हे ५०० कोटींहून अधिकदा डाऊनलोड केले गेले आहे. तसेच फेसबूक मेसेंजरवर १३० कोटी सक्रिय असल्याची माहिती देण्यात आली आहे.  

यापुढे इंस्टाग्रॅम आणि मेसेंजर होणार एकत्र- 

नवीन अपडेट्सनुसार इंस्टाग्राम आणि मेसेंजर या फिचर्सना कंपनीने एकत्र केले आहे. हे एकत्रीकरण वापरकर्त्यांच्या दृष्टीने अधिक सुलभ आणि सोपे आहे. म्हणूनच वापरकर्त्यांकडून याला अधिक पसंती देण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. 

संबंधित बातम्या