लॉकडाउनमधील ऑनलाइन योगसाधना- भाग 2

लॉकडाउनमधील ऑनलाइन योगसाधना- भाग 2
online yoga

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन योग वर्ग हे कशाप्रकारे वरदान ठरलेलं आहे, हे आपण भाग 1 मध्ये जाणून घेतलं. या दुसऱ्या भागात गर्भवती स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक आपलं आरोग्य कशाप्रकारे राखू शकतात, ते पाहुयात..

गर्भवती स्त्रिया-
आता चालण्याला मर्यादा आली असल्याने गर्भवती स्त्रियांच्या व्यायामाकडे जास्त स्मार्ट पद्धतीने बघण्याची गरज आहे. त्यांचे पोश्चर, पाठदुखी, थकवा, स्टॅमिना, मानसिक ताण, मूड, झोप, प्रेग्नंसीमध्ये वाढलेले वजन, लेबरमध्ये होणारा त्रास, डिलिव्हरी नंतरची रिकव्हरी, गरोदरपणातील मधुमेह, स्ट्रेस, डिप्रेशन, अँग्झायटी, रक्तदाब, बद्धकोष्ठता, आईबरोबरच बाळाचे आरोग्य या सर्वांसाठी उत्तम उपाय म्हणजे गरोदरपणातील पूरक अशी योगासने आणि प्राणायाम.

ज्येष्ठ नागरिक-
सध्या सर्वांत जास्त धास्ती आणि काळजी कोणाची असेल तर ज्येष्ठ नागरिकांची. त्यांचे आरोग्य, चलनवलन, मनोधैर्य, त्यांच्या कलाने सांभाळून व्यायाम घेणे गरजेचे आहे. यासाठी ऑनलाईन योग वर्ग हे त्यांच्यासाठी मानसिक व शारीरिक आधारस्तंभ ठरतील.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dainik Gomantak (@dainikgomantak)

मानसिक आरोग्य- 
योगामुळे तुमच्या आत असलेली उदंड क्षमतेची प्रचिती तुम्हाला येईल. करण्यासारखं खूप काही आहे,  मार्ग शोधला तर उत्तरं नक्कीच सापडतील. त्यामुळे खचून जाऊ नका, सगळे ठीक होण्याची वाट पाहू नका, आहात तिथून ध्येयापर्यंत पोहोचता येणे तंत्रज्ञानाने शक्य केले आहे. हे तंत्रज्ञान दुर्दैवाने समाजातील सर्व स्तरांतील लोकांना उपलब्ध होऊ शकत नाही, त्यामुळे ज्यांना ही सुविधा सहज उपलब्ध आहे, त्यांनी याचा योग्य उपयोग करून घ्यावा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com