मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी गूगल अकाऊंट मधून काढून टाका हे अॅप -

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

गूगल अकाऊंटशी  संबंधित अॅप तपासून ते काढले तर हॅकिंगपासून तसेच फसवणुकीपासून बचाव होऊ शकतो.

करोना महामारी मध्ये ऑनलाइन फ्रॉडच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. मोबाइल, लॅपटॉप किंवा डेक्सस्टॉपही हॅक होत आहेत. अशा वेळेस युजर्स त्यांचा अक्सेस लिमिटेड करून गूगल अकाऊंटशी (Google Account) संबंधित तिसरा व्यक्ती अॅप (app) काढून स्वतःला सुरक्षित (Secure) करू शकतो. आपण अनेक गोष्टीसाठी जसे की शॉपिंग, म्युझिक, आणि आशा अनेक गोष्टीसाठी  अनेकजण गूगल अकाऊंटचा वापर करतात. अशावेळी आपण एखाद्या थर्ड पार्टी अॅपला स्वतः च्या गुगल अकाऊंटशी जोडतो.या गोष्टीचा फायदा घेवुन हकर्स (hackers) युजरच्या डिव्हाईसमधून माहितीची चोरी करू शकतो. त्यामुळे नियमित गूगल अकाऊंटशी  संबंधित अॅप तपासून ते काढले तर हॅकिंगपासून तसेच फसवणुकीपासून बचाव होऊ शकतो. (how to remove  apps from google account know this simple process)

तुमच्या नावावर किती सीम कार्ड अॅक्टिव आहेत? अशी मिळवा माहिती

स्मार्ट फोनमधून कसे करावे -

- गूगल अकाऊंट ला जावे 
- त्यामध्ये सेकयूरेटी ऑप्शन वर क्लिक करावे. 
- त्यात मोबाइलमध्ये लॉगइन केलेले सगळे गूगल अकाऊंट दिसतात.  त्यामधील रिमूव्ह करायचं असलेल्या थर्ड पार्टी   सिलेक्ट करा. 
- सेकयूरेटी मध्ये थर्ड पार्टी अॅप विथ अॅक्सेस ( third-party apps with account access) या  पर्यायामध्ये  मॅनेज थर्ड पार्टी अॅक्सेस (Manage third-party app access) यावर 
क्लिक करा.      
- यानंतर सर्व थर्ड पार्टी अॅप आपल्याला दिसतील. ज्याकडे गूगल अकाऊंटचा अॅक्सेस असेल. युजर्स सर्व अॅपवर जाऊन (Remove Access) करता येते. 

बाहेरील डिव्हाइसवर जीमेल अकाऊंट लॉगआउट करायला विसरलात तर वापरा या टिप्स 

लॅपटॉपमधून असे करा रिमूव्ह   -
 - लॅपटॉपमध्ये गूगल क्रोम ओपेन करावे. 
- ब्राऊजरची एक नवीन टॅब ओपन करा. 
- यानंतर उजव्या बाजूला दिलेल्या अकाऊंट आयकॉनवर क्लिक  करा  व  Manage Your Google Account वर क्लिक करा. 
- यानंतर स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिलेल्या सेक्युरेटी (Security) वर क्लिक करा. 
- सेकयूरेटी मध्ये थर्ड पार्टी अॅप विथ अॅक्सेस ( third-party apps with account access) या  पर्यायामध्ये  मॅनेज थर्ड पार्टी अॅक्सेस (Manage third-party app access) यावर 
क्लिक करा.  
- यानंतर सर्व थर्ड पार्टी अॅप आपल्याला दिसतील. ज्याकडे गूगल अकाऊंटचा अॅक्सेस असेल. युजर्स सर्व अॅपवर जाऊन (Remove Access)करता येते. 

संबंधित बातम्या