आता व्हाटस अॅप वापरुन करू शकतो कोणालाही ट्रॅक

आता व्हाटस अॅप वापरुन करू शकतो कोणालाही ट्रॅक
WhatsApp

भारतात इंटरनेट (Internet) वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात व्हाटस अॅप (WhatsApp) वापणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन (Smartphone) आहेत. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये हे अॅप (App) समविषट आहे. परंतु हे अॅप बरेच वेळा वापरुन ही अनेकांना यामधील  काही  फीचर्सची  (Features) माहिती नसते. आज अशाच एक फीचर्सबद्दल ची माहिती जाणून घेऊया. त्याच्या मदतीने आपण कोणताही नवीन पत्ता शोधून काढू शकतो. यामध्ये फीचर्समुळे मित्र परिवार व कुटुंबातील सदस्याना देखील स्वतः चे लोकेशन पाठवू शकता येते. या फीचरचा वापर सुक्षेसाठी (safety) सुद्धा करता येतो. हे फीचर कसे वापरतात ते आता समजून घेऊया. (how to share live location on whatsapp)

जीमेल पासवॉर्डशिवाय करता येणार लॉगइन...
 
असे शेयर करता येते लोकेशन 
- पहिले व्हाटस अॅप ओपेन करा. 

- नंतर चॅट पर्यायवर जावे. 

- त्यानानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला स्वतः चे लोकेशन पाठवायचे आहे, त्याचे नाव निवडा. 

- त्यामध्ये गेल्यावर क्लिप आयकॉन  दिसेल, त्यावर जाऊन क्लिक करा. 

- तेथे तुम्हाला लोकेशन हा पर्याय निवडावे लागेल. 

- नंतर तेथे तुमचे करेंट लोकेशन आणि शेअर लिव लोकेशन असे दोन पर्याय दिसतील. 

- या दोनपैकी तुम्ही कोणतेही पर्याय निवडून पाठवु शकता. 

 लोकेशन शेअर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या-  

लोकेशन शेयर करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. तुम्ही जर कोणाला तुमचे करंट  लोकेशन पाठवत असाल तर ते तुम्ही ज्या  जागी किंवा ठिकाणी आहात, तेथील लोकेशन असते. 
तसेच एखद्या व्यक्तीला जर तुम्ही लाईव्ह लोकेशन पाठवले असेल तर ते तुम्ही जसे प्रवास कराल तसे हे लोकेशन तुमची माहिती देत जाणार आहे. लाईव्ह लोकेशनची निवड केल्यावर हे तुम्हाला 15 मिनिट, 1 तास, आणि 8 तास असे पर्याय देते. याच अर्थ जर तुम्ही कोणला लाईव्ह लोकेशन पाठवले असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला ट्रॅक करू शकता. आपल्या सोयीनुसार आपण यातील पर्याय निवडू शकतो. लाईव्ह लोकेशन बंद करायचे असेल तर तुम्ही लाईव्ह लोकेशन शेयरवर जाऊन स्टॉप वर क्लिक करू शकता.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com