Happiness Tips: आनंदी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' 5 वेलनेस टिप्स

जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात काहीही चांगले होत नाही तर या टिप्स नक्की ट्राय करा.
Wellness Tips For Happiness
Wellness Tips For HappinessDainik Gomantak

Wellness Tips For Happiness: प्रत्येकाला आपल्या आयुष्यात खूप आनंद हवा असतो, पण आनंद लोकांच्या चेहऱ्यावर क्वचितच दिसतो. तुम्ही म्हणाल की ज्यांच्याकडे पैसा आहे ते सुखी आहेत आणि पैसे असलेले लोक कमी आहेत. त्यामुळे आनंद कमी आहे.

आनंद हा पैसा किंवा वस्तूंमधून मिळत नाही. तर अनेक वेळा निरोगी आरोग्यामुळे आयुष्यात जगणे सोपे होते.

जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात या हार्मोन्सचा स्राव कमी झाला तर त्याला भावनिक सुन्नपणा येतो आणि आनंदासारखी कोणतीही भावना जाणवत नाही. डोपामाइन आणि सेराटोनिन अशी या हार्मोन्सची नावे आहेत जी आपल्याला आनंदी वाटतात.

जर शरीरात निगेटिव्ह हार्मोन्स म्हणजेच कॉर्टिसॉलचा स्राव वाढला तर सर्वकाही चांगले असूनही व्यक्तीला आनंद जाणवू शकत नाही. दुःख राग त्याच्यावर वर्चस्व गाजवतो. आयुष्यात (Life) जेव्हा कठीण काळ चालू असतो तेव्हा अशा भावना अधिक वर्चस्व गाजवू लागतात.

आनंद (Hippiness) हा भावनेतून येतो हे समजून घेण्यासाठी एवढं पुरेसे असले तरी, ही भावना आहे. पैशाने (Money) विकत घेता येणारी वस्तू नाही. पैसा आणि वस्तू काही क्षणिक आनंद देतात हे खरे आहे.

परंतु कठीण काळात कमी पैशात आणि अधिक आव्हानांमध्ये आनंदी कसे राहायचे हे शिकणे महत्त्वाचे आहे. आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनाशी संबंधित अशा 5 टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदाची भावना वाढेल.

  • आनंदी राहण्यासाठी काय करावे?

जीवनात सतत सकारात्मक वाढ करण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी दैनंदिन जीवनात पुढिल पद्धतींचा समावेश करा.

  • दिवसाची सुरुवात

तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करावी. सकाळी उठल्यावर कामाच्या दडपणाने स्वतःला भारून टाकण्याऐवजी पहिले देवाचे आभार मानावे आणि तुमचा दिवस चांगला जावो अशी प्रार्थना करावी. 

ही गोष्ट तुम्हाला अगदी लहान वाटत असली तरी तिचा प्रभाव खूप पडतो. हे दररोज करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाच्या सुरुवातीला देवाची भक्ती दाखवता तेव्हा तुमच्यामध्ये सकारात्मकता वाढते, ज्याचा तुमच्या निर्णयक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो.

  • दीर्घ श्वास घ्या- देवाचे आभार मानल्यानंतर 

बेडवर बसून 5 ते 7 दीर्घ श्वास घ्या आणि या दरम्यान तुमचे संपूर्ण लक्ष श्वासाद्वारे शरीरात जाणार्‍या हवेवर केंद्रित करा. हे तुम्हाला तुमचे मन शांत करण्यास आणि तुमची ऊर्जा चॅनेलाइज करण्यात मदत करेल.

  • स्वतःला हे वचन द्या

स्वतःला वचन द्या की दिवसाच्या कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल. तेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशात 30 मिनिटे नक्कीच घालवायला हवा. असे केल्याने शरीराला जैविक घड्याळ व्यवस्थापित करण्यास मदत होते.

  • हर्बल टी

दिवसभरात जास्त चहा-कॉफी (Tea-Coffee) घेण्याऐवजी हर्बल-चहा प्यायला सुरुवात करा. असे केल्याने शरीर आतून बरे होते. तुम्ही ब्लॅक टी, लेमन टी, मिंट टी इत्यादींचा आस्वाद घेऊ शकता. कारण त्यांचा सुगंध मनाला शांत करतो.

  • पुस्तकाचे वाचन

रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आवडीच्या कोणत्याही पुस्तकाची काही पाने वाचण्याची सवय लावा. हे पुस्तक तुमच्या वैयक्तिक वाढीशी किंवा व्यावसायिक वाढीशी संबंधित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com