भेसळयुक्त मिरची पावडर नेमकी कशी ओळखाल? जाणून घ्या

भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाने (FSSAI) अलीकडे भेसळ चाचणीसाठी साधे प्रयोग शेअर करत आहे.
 Adulterated chili powder
Adulterated chili powderDainik Gomantak

तुमच्या स्वयंपाकघरातील (kitchen) साहित्य भेसळयुक्त असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. म्हणूनच घटकांचा वापर करण्यापूर्वी त्यांची चाचणी (Testing) करणे हा एकमेव मार्ग आहे. भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरणाने (FSSAI) अलीकडे भेसळ चाचणीसाठी साधे प्रयोग शेअर करत आहे. आपण वापरत असलेल्या मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी किंवा वाळू किंवा तालक पावडर आहे की नाही, हे कसे तपासायचे हे सरकारी संस्थेने (Government agency) नुकतेच दाखवले.

 Adulterated chili powder
ब्लॅक वॉटरचे महत्व काय; जाणुन घ्या...

नेमकं काय कराल?

  1. एक ग्लास पाणी घ्या.

  2. त्यात थोडी चमचा मिरची पावडर घाला.

  3. मिश्रणाची तपासणी करा. आपल्या तळहातावर थोड्या प्रमाणात मिश्रण घ्या आणि ते चांगले चोळा.

  4. जर तुम्हाला घासल्यानंतर काही खरखर जाणवत असेल, तर मिरची पावडर विटांच्या भुकटीने भेसळ केलेली असते. जर मिश्रणाला फेस येत असेल किंवा गुळगुळीत वाटत असतील तर ते साबण दगडाने भेसळयुक्त आहे.

यापूर्वी, FSSAI ने तेल आणि हिरव्या वाटाण्यातील भेसळ तपासण्यासाठी एक साधी चाचणी देखील शेअर केली होती. आपण वापरत असलेल्या हिरव्या भाज्यांमध्ये भेसळ आहे का हे तपासण्यासाठी एक सोपा प्रयोग सुचवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com