Bhogi Bhaji Recipe: आज तयार करा भोगीची स्पेशल भाजी, जाणून घ्या महत्व

टेस्ट सोबतच आरोग्यासाठी उत्तम असलेली भोगीची भाजी नक्की ट्राय करा.
Bhogi Bhaji Recipe
Bhogi Bhaji RecipeDainik Gomantak

Bhogi Bhaji Recipe: संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या दिवशी शेतात भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. हिवाळ्यात मिळणाऱ्या घेवडा, हरभरा, बोरं, तुरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा या खास भाज्या आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर असतात. या भाजीमध्ये तीळ, शेंगदाणे, खोबर आणि खसखस असे पदार्थ असल्याने हिवाळ्यात शरीरासाठी आरोग्यदायी असते. जाणून घेऊया कशी बनवायची भोगीची भाजी.

  • भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

घेवडा

हरभऱ्याचे दाणे (ओला हरभरा)

काटेरी छोटी वांगे

बटाटे

रताळे

गाजर

फरसबीच्या शेंगा

खोबरं (किसलेले)

तीळ (भाजलेले)

चिंचेचा कोळ

गुळ

लाल तिखट

गोडा मसाला

तेल

जीरे

हिंग

कडीपत्ता

चवीनुसार मीठ

Bhogi Bhaji Recipe
Winter Food: हिवाळ्यात 'हे' मासे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास ठरते फायदेशीर
  • भोगीची भाजी कशी बनवायची

सर्व प्रथम भाजीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या धुवून स्वच्छ करुन घ्या.

आता घेवडा सोलून मोठे तुकडे करा.

कांटेरी वांग्याला मध्ये चीर देऊन चार भाग करा.

बटाटा, गाजर, रताळे सोलून मोठे तुकड्यात कापून घ्या.

आता खोबरं आणि तीळ बारीक वाटून घ्या.

नंतर एक कढईत तेल गरम करून त्यात फोडणीचे दिलेले साहित्य घाला.

जीरे तडतडले की घेवडा आणि हरभरे घाला.

थोडेसे मीठ घालून 2 मिनटे परतवा.

घेवड्यावर थोडेसे डाग दिसायला लागले की त्यात राहिलेल्या सगळ्या भाज्या घाला.

तेलात सगळ्या भाज्या नीट परतून घ्या.

आता थोडंस मीठ आणि पाणी घालून झाकण ठेऊन भाज्या शिजू द्या.

साधारण 10 ते 12 मिनटात भाज्या शिजल्यावर लाल तिखट, गोडा मसाला आणि वाटलेलं वाटण घाला.

थोडं गरम पाणी आणि मीठ घालून सगळं नीट मिक्स करा.

एक उकळी आल्यावर त्यात गुळ आणि चिंचेचा कोळ घाला.

आता त्यात थोडे पाणी घालून अजून एकदा उकळी येऊन तेलाचा तवंग वर दिसू लागला की गॅस बंद करायचा.

तुमची भोगीची भाजी तयार आहे. कोथिंबीरने गार्निश करुन गरमा गरम सर्व्ह करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com