Skin Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी 'असा' करा साखरेचा वापर

Skin Care from Sugar: त्वचा सुंदर, ग्लोइंग दिसण्यासाठी महिला अनेक प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात.
Skin Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी 'असा' करा साखरेचा वापर
Skin Care Tips Dainik Gomantak

त्वचा सुंदर, ग्लोइंग बनवण्यासाठी महिला अनेक प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात. महिला फेस मास्क, फेस स्क्रब आणि फेस मसाज देखील करतात. म्हणजे त्वचेला डागरहित आणि चमकदार बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि पैसाही खर्च करावा लागतो. एवढं करूनही त्वचेवर ग्लो येत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगत आहोत. विशेष म्हणजे ही गोष्ट तुम्हाला घरी सहज मिळेल. साखर आरोग्यासाठी (Health) फायदेशीर नसली तरी त्वचेसाठी असू शकते. चला तर जाणून घेउया साखरेपासून त्वचा कशी चमकदार बनवता येते. (Skin Care Tips For Glowing Skin)

* लिंबू आणि साखर

त्वचेची टॅनिंग आणि डाग दूर करण्यासाठी साखर आणि लिंबू यांचे मिश्रण लावणे फायदेशीर ठरते. यासाठी दोन चमच साखरमध्ये चार चमचे लिंबाचा रस मिक्स करावे. नंतर चेहऱ्यावर (Face) लाऊन , हलक्या हातांनी मसाज करा आणि काही वेळाने धुवावे.

* दही आणि साखर

दही आणि साखरेचे मिश्रण देखील चमकदार त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. दह्यात साखर मिसळून चेहऱ्याला लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. त्वचेला टवटवीत करण्यासोबतच ते त्वचेला एक्सफोलिएटही करते.

Skin Care Tips
Evening Snacks: हेल्दी आणि लो कॅलरी पदार्थांचे सेवन आरोग्यदायी

* कॉफी आणि साखर

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कॉफी पावडरमध्ये साखर मिक्स करून लावू शकता. नारळाच्या तेलात साखर आणि कॉफी देखील मिक्स करता येते. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून मसाज करा. डेड स्किन काढण्यासोबतच त्वचेला मॉइश्चरायझ होईल.

* बीटरूट आणि साखर

चमकदार त्वचेसोबतच ओठांची निगा राखणेही खूप महत्त्वाचे आहे. ओठांना गुलाबी ठेवण्यासाठी तुम्ही बीटरूटमध्ये साखर मिक्स करून लावू शकता .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.