Valentine Week 2021 : 'हग डे'ला आपल्या पार्टनरला हक्काने मिठी मारा, पण...

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

कधीकधी आपल्या जीवन साथीदारीपुढे भावना व्यक्त करणे खूप कठीण असते. असही म्हटले जाते की स्पर्शाशिवाय प्रेम अपूर्ण असतं. आपले प्रेम व्यक्त करतांना एक्साइटमेंटमध्ये येवून आपल्या पार्टनरला मिठी मारतांना आपल्या संयमाचे आणि वर्तवणूकीचे भान विसरू देऊ नका.

Valentine Week 2021: व्हॅलेंटाईन विक सुरू आहे, आतापर्यंत आपण टेडी डे, चॉकलेट डे, प्रपोज डे, रोज डे सगळेच डे सेलिब्रेट केले आहे. आणि आज हग डे आहे.  म्हणजेच एकमेकांना आलिंगन देण्याचा दिवस, या सप्ताहामधला प्रत्येकच दिवस प्रेमींसाठी खूप खास असतो, परंतु प्रेमाच्या या आठवड्यात, सहाव्या दिवसाची भावना म्हणजेच हग डेचे शब्दात वर्णन केले जाऊ शकत नाही. असे म्हटले जाते की कधीकधी आपल्या जीवन साथीदारीपुढे भावना व्यक्त करणे खूप कठीण असते. असही म्हटले जाते की स्पर्शाशिवाय प्रेम अपूर्ण असतं.

पण जेव्हा आपण प्रेम दाखवण्यासाठी आपल्या जोडीदाराला आमल्या मिठीत घेता आपले प्रेम स्पर्शातून व्यक्त करता तेव्हा आपोआप त्याच्याही मनात लपलेल्या सर्व भावना तो व्यक्त करतो. प्रत्येक स्पर्शाची परिभाषा वेगवेगळी असते. दु:खातला, सुखातला, आनंदातला, मैत्रितला आणि प्रेमातला ज्या त्या नात्यातला स्पर्श आणि त्या स्पर्शामागची भावना वेगवेगळी आणि स्पेशल असते. तेव्हा जोडीदाराला मिठी मारताना आपण अशा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे आपल्या या प्रेमाची भावना विश्वसनिय वाटेल. तो क्षण आणखी अविस्मरणीय होईल, यातून एकमेकांबद्दल तुम्हाला आणखी रोमँटिक फिलिंग येईल.

May be a black-and-white image of 1 person, standing and outdoors

आम्हाला माहित आहे की आपण चालताना, धावतांना कोणालाही मिठी मारणार नाही. परंतु आपल्या मनात जोडीदाराला हक्काने मिठी मारण्याची इच्छा नक्कीच असते. जर तुम्ही आपल्या जोडीदाराला मिठी मारण्याच्या विचारात असाल तर त्यात शुद्ध हेतू असणे जास्त गरजेचे आहे.

आपल्या जोडीदाराच्या मनात काय लपलंय?

याचे कारण असे आहे की, कधीकधी नवीन रिलेशनशिपमध्ये फिजिकल कॉन्टैक्ट असुरक्षित वाटतो, ज्यामुळे कधीकधी नात्यातील संबंध बिघडण्याची शक्यता असते. तेव्हा जर तुमच्या नात्याची बॉंडींग खूप छान असेल आपल्या पार्टनरला आपल्यावर विश्वास असेल तर त्याच्या किंवा तीच्या मनाचा विचार करून आणि वेळेचे भान ठेवून त्याला तुम्ही लगेच उशीर न करता प्रेमाने मिठी मारू शकता.

May be a black-and-white image of child and outdoors

आपल्या जोडीदाराला मिठीत घेतांना घाई करू नका

जेव्हा कोणी आपल्या जोडीदाराला दोन्ही हातांनी मिठी मारतो तेव्हा त्या कपल ला एकमेकांच्या भावना जास्त समजल्या जातात. अशा वेळी, केवळ आपल्या पार्टनरला फक्त आपल्या भावनाच कळतात असं नाही तर एकमेकांसोबत तुम्ही किती सहज वावरू शकता याचा विश्वास प्राप्त होतो. आपण जर आपल्या पार्टनरला मिठी मारत असताना आपल्या जोडीदारावर प्रेम करू इच्छित असाल तर अशा वेळी घाई करू नका. त्याऐवजी आपल्या पार्टनर ला तुम्ही हा विश्वास द्या की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करता. 

 

आपल्या जोडीदाराला जास्त वेळ Hug करू नका कारण...

आपल्या जोडीदाराला हग करतांना  बरेच लोक उताविळ असतात जास्त घाई करतात. या वेळी ते विसरतात की या उतावळेपणामुळे ते आपली इमेज खराब करत असतात. अशावेळी आपला पार्टनर स्पेशली मुली अनकंफर्टेबल फील करत असतात. आपल्या जोडीदाराला मिठी मारताना, हे लक्षात ठेवा की प्रथम त्याच्या किंवा तिच्या डोळ्यांमध्ये बघा एकमेकांना विश्वासात घ्या, एक गोड स्मित करा आणि नंतर त्यांला किंवा तीला आपल्या मिठीत घ्या. यामुळे तुमचा पार्टवर तुमच्या जवळ तर येणारच त्याचबरोबर तो तुमच्यावर आपलं प्रेम आणखी चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकेल.

असे घ्या आपल्या जोडिदाराला मिठीत

जर आपणही या हग (HUG) डे ला आपल्या मैत्रिणींला आपल्या मित्राला मिठी मारण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचं आहे. मुलींना गळ्यात हात टाकून मिठी मारलेली आवडते. तर मुलांना त्यांच्या कमरेला विळखा घालून मिठी मारलेली आवडते. आणि हो, आपले प्रेम व्यक्त करतांना एक्साइटमेंटमध्ये येवून आपल्या पार्टनरला मिठी मारतांना आपल्या संयमाचे आणि वर्तवणूकीचे भान विसरू देवू नका हे लक्षात असु द्या.

 

संबंधित बातम्या