जर तुम्ही योग्य त्या वेळी ही फळं खाल्ली तर......

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

आपल्याला फळ खायची आहेत, ते आरोग्यासाठी लाभदायक आहे एवढच माहिती असतं. पण हल्ली लोकं आधुनिक जीवनशैलीत इतके व्यस्त झाले आहेत की त्यांना आपल्या आरोग्याबद्दल विचार करायला वेळ मिळत नाही.

फळं खाण्याची योग्य वेळः आपल्याला फळ खायची आहेत, ते आरोग्यासाठी लाभदायक आहे एवढच माहिती असतं. पण हल्ली लोकं आधुनिक जीवनशैलीत इतके व्यस्त झाले आहेत की त्यांना आपल्या आरोग्याबद्दल विचार करायला वेळ मिळत नाही. जेवणाच्या टेबल वर बऱ्याच वेळी लोक काम करत असतात, ही सवय आपल्या आरोग्यास अपायकारक आहे. आपण काहीतरी खाण्यासाठी योग्य वेळ कोणती याचा विचार कधीच करत नाही आणि याची काळजीही घेत नाही. पोट भरण्यासाठी आपण कधीही काहीही खातो. अशा परिस्थितीत फळं खाण्याची योग्य वेळ कोणती आहे हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. बर्‍याच वेळा आपल्या हातात पौष्टिक फळे असतात पण योग्य वेळी ती न खाल्याने ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आता आपल्यासाठी फळे खाणे कोणत्या वेळी फायद्याचे असणार हे आपण जाणून घेऊया.....

वेळेवर फळं खाणं का महत्त्वाचं आहे

वास्तविक फळ आपल्या शरीरात फ्रक्टोज देतात जे सहजपणे चरबीमध्ये रूपांतरित होतात. म्हणून सकाळी रिकाम्या पोटी फळ खाल्ले तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. नाश्तासाठी तुम्ही फळे खावू शकता. सहसा सायंकाळी 6 नंतर फळे खाल्ल्याने आपल्या पचनशक्तीत सुधारणा होते.

संत्री
संत्री कधीही नाश्त्याच्या आधी किंवा रिकाम्या पोटी खावू नये असे केल्यास संत्रा खाल्ल्याने आम्लपित्त एसिडिटी होवू शकते. साधारण दुपारी 4 नंतर संत्री खाण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे.

द्राक्षे

रिकाम्या पोटी द्राक्षे खाल्याने आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. द्राक्षे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करते.

केळी
दुपारच्या जेवणानंतर केळी खाल्ल्याने शरीराला सर्वाधिक फायदा होतो. केळीमध्ये आढळणारे पौष्टिक घटक रोग प्रतिकारशक्ती वाढवतात.

डाळिंब
नाश्ता करतांना डाळिंब खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. सकाळी अनार खाल्ल्याने दिवसभर शरीरात उर्जा कायम राहते. रात्री डाळिंब खाल्याने त्याचा आपल्या शरीराला कुठलाच फायदा होत नाही.

पपई
पपई सकाळी नाश्त्या नंतर आणि दुपारच्या जेवणाच्या आधी खावी.  ज्या लोकांचे वजन कमी असते जे लोकं सडपातळ असतात त्यांनी दुपारच्या जेवणा नंतरच पपई खाल्ली पाहिजे. कारण पपई खाल्ल्याने वजन वाढतं.

आंबा
आंबा कोणत्याही वेळी खाऊ शकतो पण जर तो जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर 1 तास खाला गेला तर आणखी चांगले होईल. आंब्याचा दुधात शेक करून पिल्याने पण त्याचा आरोग्यास  चांगला फायदा होवू शकतो.

मोसंबी

उन्हात जाण्यापूर्वी आणि बाहेरून आल्यानंतर मोसंबी खाल्ली पाहिजे. हे शरीरातील पाण्याची कमतरता त्वरित दूर करते आणि डिहायड्रेशनच्या समस्येपासून आपला बचाव करते.

संबंधित बातम्या