Eyebrow केल्यानंतर पुरळ येत असतील तर या टिप्स नक्की फॉलो करा

आयब्रोजला चांगला आकार असेल तर चेहरा अधिक चांगला दिसतो.
Eyebrow केल्यानंतर पुरळ येत असतील तर या टिप्स नक्की फॉलो करा
Eyebrow केल्यानंतर पुरळ येत असतील तर या टिप्स नक्की फॉलो करा Dainik Gomantak

चेहऱ्याची सुंदरता आयोब्रोजच्या (Eyebrow) आकारावर अवलंबून असते. आयब्रोज महिन्यातून एकदा करावी लागते. पण बऱ्याच महिला अनेक महीने आयब्रोज करणे टाळतात. प्रत्येक महिलेला माहिती आहे की आयब्रोज (Eyebrow) केल्याने चेहरा चांगला दिसतो. जर आयब्रोजला चांगला आकार असेल तर चेहरा अधिक चांगला दिसतो. अनेक महिलांना आयब्रोज करतांना त्रास होतो आणि चेहऱ्यावर पुरळ येतात. नाजुक त्वचा असलेल्या महिलांना आयब्रोज (Eyebrow) करतांना अधिक त्रास होतो. त्यांच्या कपाळावर लाल पुरळ आणि दाग येतात. जर तुम्हाला सुद्धा असा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Dainik Gomantak

* ब्लीच:

आयब्रोज (Eyebrow) केल्यानंतर ब्लीच करणे टाळावे. कारण असे केल्यास त्वचा अधिक जळजळ होते. कारण आयब्रोज आणि ब्लीच केल्यानंतर त्वचा अधिक नाजुक होते. यामुळे आयब्रोज करायचे असेल तर ब्लीच करण्यापूर्वी करावे.

Dainik Gomantak

* बर्फ

चेहऱ्यावरील पुरळ कमी करायचे असेल तर बर्फाचे तुकडे पुरळ आलेल्या भागावर फिरवावे. यामुळे त्वचेवरील जळजळ कमी होते.

Dainik Gomantak

* गरम टॉवेल

आयब्रोज करण्याआधी आयब्रोज मऊ करायचे असेल तर गरम टॉवेलचा वापर करावा. यामुळे आयब्रोज केल्यानंतर त्वचेची जळजळ कमी होते.

Dainik Gomantak

* अॅलोवेरा जेल

अनेक महिलांना आयब्रोज केल्यानंतर कपाळावर पुरळ येतात. त्या महिलांनी लगेच कपाळावर अॅलोवेरा जेल लावावा. यामुळे त्वचा मऊ होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com