जर निरोगी मूल हवे असेल तर पुरुषांनी आजपासूनच 'या' टिप्सचा अवलंब करावा

कारण, त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते, जे एक अँटिऑक्सिडेंट आहे.
Healthy Baby
Healthy BabyDainik gomantak

निरोगी बाळ होण्यासाठी पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या निरोगी असणे आवश्यक आहे. शुक्राणूंची संख्या किंवा गुणवत्ता कमी झाल्यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्व देखील येऊ शकते. परंतु, शुक्राणू वाढवण्यासाठी पुरुष काही फळे खाऊ शकतात आणि इतर टिप्स देखील स्वीकारू शकतात. आयुर्वेद (Ayurveda) तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी शुक्राणूंची संख्या वाढवली पाहिजे. त्यासाठी खालील टिप्सचा अवलंब करता येईल.

Healthy Baby
'या' 5 गोष्टी दुधात टाका, व्हायरल इन्फेक्शन आणि ओमिक्रॉनपासूनही होईल बचाव

डॉक्टरांच्या मते पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता आणि शुक्राणू वाढवण्यासाठी खालील फळे आणि टिप्स अवलंबल्या पाहिजेत.

1. किवी

डॉक्टर (Doctor) सांगतात की शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी अँटिऑक्सिडंटने युक्त फळे खायला हवीत. त्यामुळे शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी किवी फळ सर्वात उपयुक्त आहे. कारण, त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-सी असते, जे एक अँटिऑक्सिडेंट आहे.

2. मेथी

आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, मेथी हे पुरुषांच्या लैंगिक समस्यांसाठी खूप फायदेशीर अन्न आहे. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की मेथी शुक्राणू आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवून पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. रात्री एक वाटी पाण्यात दोन चमचे मेथीचे दाणे भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी आणि मेथीचे दाणे खा.

Healthy Baby
किस केल्याने खुलतं स्त्रियांचं सौंदर्य; जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे

शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी

पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी खालील टिप्स देखील स्वीकारल्या पाहिजेत. जसे-

रोज व्यायाम करा.

व्हिटॅमिन-सी (Vitamin) पुरेशा प्रमाणात घ्या.

तणाव व्यवस्थापित करा.

पुरेसे झिंक घ्या.

धूम्रपान सोडा.

अस्वास्थ्यकर पदार्थ वगैरे खाऊ नका.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com