ताणतणाव कमी करायचं असेल तर... 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

हा ताण कमी करायचा असेल तर अन्नात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 8600  लोकांवर केलेल्या अभ्यासानुसार  काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

गेल्या वर्षभरापासून कोविड-19 मुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. अशा संकटाच्या अनेकजण वर्क फ्रॉम होम (Work From Home)  करत आहेत. त्यामुळे अनेक जणांना ताणतणावाचा  (Stress)  प्रचंड त्रास होत असल्याचे समोर आले आहे. हा ताण कमी करायचा असेल तर अन्नात फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 8600 लोकांवर केलेल्या अभ्यासानुसार  काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. ताणतणावाचा सामना करणाऱ्या लोकांना दररोज 470 ग्रॅम फळे आणि भाज्या खायला देण्यात आल्या. त्यानंतर त्यांचा ताण 10 टक्क्यांनी कमी झाल्याचे संशोधन करणार्‍या एडिथ कोवेन विद्यापीठाने दावा केला आहे. तर डब्ल्यूएचओ देखील निरोगी राहण्यासाठी दररोज 400 ग्रॅम  फळे आणि भाज्या खाण्याची शिफारस करतो. (If you want to reduce stress ...) 

- फळ आणि भाज्यांचे थेट मेंदूशी कनेक्शन
जर्नल क्लिनिकल न्यूट्रिशन मधील सार्वजनिक संशोधनानुसार, या अभ्यासात 24 वर्ष ते 94 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. यात फळांचा आणि भाज्यांचा थेट संबंध मेंदूच्या आरोग्यामध्ये असल्याचे संशोधनाने सिद्ध करण्यात आले आहे. 

- दर १० पैकी एक व्यक्ती मानसिक समस्येने ग्रस्त 
ऑस्ट्रेलियासह जगभर मेंदूशी संबंधित आजारांची प्रकरणे वाढत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये दोनपैकी एका व्यक्तीस मानसिक समस्या आहे. जगाविषयी सांगायचे तर, दर दहा लोकांपैकी एक जण मानसिक आजाराने ग्रस्त आहे, अशी माहिती संशोधक सिमोन यांनी दिली आहे. 

- दीर्घ कालपर्यंत चालणारा आजार अनेक रोगांना आमंत्रित करतो 
काही काळ टिकणारा ताण सामान्य मानला जातो, परंतु हा ताण बराच काळ राहिल्यास त्याचा थेट मेंदूवर परिणाम होतो. असे आजार दीर्घ काळ राहिल्यास त्याचा थेट परिणाम हृदयविकार, मधुमेह, नैराश्य आणि अस्वस्थता अशा गंभीर समस्या निर्माण करू शकतो,  असेही सिमोन यांनी स्पष्ट केले आहे. 

- फळे आणि भाज्या खाण्यामुळे ताण कमी का होतो?
संशोधक सिमोनच्या मते, फळ आणि भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनोइड असतात जे शरीरातील जळजळ आणि तणाव कमी करण्यासाठी कार्य करतात. म्हणून, फळे आणि भाज्या आपल्याला मानसिक आरोग्य रखण्यास मदत करतात. 
 

संबंधित बातम्या