रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शुद्धिक्रियांचं महत्त्व

immunity.jpg
immunity.jpg

कोविडवर (Ciovid-19) मात करण्यासाठी किंवा त्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती  (Immunity Power) वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे सर्वांना ठाऊकच असेल. यासाठी नियमित व पौष्टिक आहारासोबतच योगासनांचे (Yoga) काय महत्त्व आहे, हे आम्ही तुम्हाला याआधीच्या लेखात सांगितले आहे. परंतु आसनांचा अभ्यास तेव्हाच परिणामकारक ठरतो ज्या वेळेला शरीर साफ आणि शुद्ध असतं. याचीही तरतूद योगामध्ये आहे. (Importance of purification to boost the immune system)

योगात शारीरिक-मानसिक स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे अनेक योग ग्रंथात ठिकठिकाणी शुद्धी, शौच असे शब्द वापरण्यात आले आहेत. सध्या आपण सारखे हात धुवत आहोत, पण ज्या संस्कृतीत आपण वाढलो त्यात घरात चप्पल घालून न फिरणे, बाहेरून आल्यावर हात-पाय धुणे हे प्रकार नवीन नाहीत. तसेच आंघोळ करणे, दात घासणे इत्यादीसुद्धा. पण ही झाली बाहेरची स्वच्छता.

आपल्या शरीराच्या आत साठत असणारी घाण साफ करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. निसर्गाने आपल्या शरीराच्या आतील घाण बाहेर काढण्याचे मार्ग आधीच उपलब्ध करून दिलेले आहेत. जसे डोळे, श्वसनमार्ग, त्वचा, मल-मूत्र विसर्जन करणारी यंत्रणा वगैरे. परंतु आपली जीवनशैली, वातावरण व आंतर इंद्रियांच्या आरोग्याचे चढ-उतार अशा अनेक कारणांनी शरीरात ठिकठिकाणी घाण साचून राहते. हीच घाण (toxins) पुन्हा रक्तात शोषली जाते व अनेक विकारांना जन्म देते. आता आपण योगातील काही शुद्धिक्रियांचा थोडक्यात आढावा घेऊ. ही आतील शुद्धी आपली रोगप्रतिकार शक्ती अधिक बळकट करणार आहे.

कपालभाती - कपालभाती हा श्‍वसनाचा व्यायाम असला तरी तो प्राणायाम नाही - एक शुद्धिक्रिया आहे. नाक, सायनस व फुफ्फुसांमधील घाण बाहेर फेकण्यात कपालभातीचा उपयोग होतो. कपालभातीचे शेकडो शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे आहेत. त्यामुळे तो जरूर करावा.

नेती - जलनेती व सूत्रनेती असे दोन प्रकार नेतीमध्ये येतात. यात नाकाची व घशाची पूर्ण स्वच्छता होते. तसेच सायनस व डोळे साफ होतात. श्वासनलिकेसंबंधित अनेक समस्यांवर उत्तम उपाय म्हणजे नेती. नेती केल्याने नाकातून होणारे स्त्राव रक्तातील विषारी द्रव्ये बाहेर फेकून टाकतात.

वमन धौती - पोटातील घाण, कफ, आम्ल (acid) इत्यादी वमन क्रियेने बाहेर पडते. ही घाण साफ करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती वेळोवेळी साफ न केल्यास अन्नमार्गात असलेले विषारी पदार्थ साठून राहतात. काही काळातच ती रक्तात प्रवेश करून निरनिराळे आजार उत्पन्न करतात. अन्ननलिका व श्वासनलिका दोन्ही साफ करून, आंतर इंद्रियांचे सूक्ष्म अभिसरण वाढवून, तसेच ग्रंथींचा स्त्राव वाढवून रक्तातील विषारी द्रव्ये खेचून बाहेर फेकणारी क्रिया म्हणजे वमन धौती.

या तीन क्रिया सोडून इतरही अनेक शुद्धीक्रिया आहेत. परंतु आज कोरोनाच्या निमित्ताने श्वसन संस्थेच्या आरोग्यासाठी या तीन क्रिया उपयोगी आहेत. आपण त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकणे अत्यावश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com