रुग्ण बरे होण्याच्या दरात 40.98% पर्यंत सुधारणा

pib
शनिवार, 23 मे 2020

आतापर्यंत, एकूण 48,533 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत, 3,234 रुग्ण बरे झाले  आहेत.

नवी दिल्ली,

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने श्रेणीबद्ध, पूर्वदक्षता घेऊन सक्रीय उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

कालपासून, देशातील कोविड-19 च्या रूग्णांची संख्या 6,088 नी वाढली आहे. आता देशातील कोविड रुग्णांची एकूण संख्या 1,18,447 इतकी आहे. उपचाराखाली असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 66,330 एवढी आहे.

आतापर्यंत, एकूण 48,533 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत, 3,234 रुग्ण बरे झाले  आहेत. त्यामुळे आता, रुग्ण बरे होण्याचा दर, 40.98 टक्के इतका झाला आहे.

सध्या आपण जेव्हा चौथ्या लॉकडाऊनमधून जात आहोत, त्यामुळे, कोविड-19 चा सामना करणाऱ्या आणि त्यापासून प्रतिबंधन करणाऱ्या सवयी आपल्याला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवायच्या आहेत. म्हणजेच रोज सतत हात धुणे, आत स्वच्छ ठेवणे, मास्कचा वापर, चेहरा झाकणे, ‘दोन हात लांब’  शारीरिक अंतर, वृद्ध आणि आजाराला बळी पडणाऱ्या लोकांचे संरक्षण, आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, प्रतिकारशक्ती वाढवून स्वसंरक्षण,  आरोग्य सेतू ऐपचा वापर, कोरोनाची लक्षणे आढळल्यास, त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे आणि काहीही भीती न बाळगता कोविड-19 वर उपचार घेणे, हे सगळे उपाय आपल्याला करायचे आहेत.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in  आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या

हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf

संबंधित बातम्या