Clapping Therapy: व्याधी अनेक...उपचार एक, जाणून घ्या ‘क्लॅपिंग थेरपी’ मुळे होणारे लाभ

आधुनिक काळात क्लॅपिंग थेरपीचे महत्व पटू लागल्याने मुद्दाम ही थेरपी वापरण्यासाठी डॉक्टरांकडून सल्लाही देण्यात येऊ लागला आहे.
Clapping Therapy
Clapping TherapyDainik Gomantak

देवाची आरती करताना किंवा उत्साहाच्या क्षणी आपण आपसुकच टाळ्या वाजवतो. या टाळ्या वाजवल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे होतात. या प्रकाराला ‘क्लॅपिंग थेरपी’ असं म्हटलं जातं. आधुनिक काळात याचे महत्व पटू लागल्याने मुद्दाम ही थेरपी वापरण्यासाठी डॉक्टरांकडून सल्लाही देण्यात येऊ लागला आहे. मानवी शरीरात ३४० प्रेशर पॉइंट्स असतात. त्यापैकी २७ हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. त्या प्रेशर पॉइंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होतात.

क्लॅपिंग थेरपी-

  • खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यांसमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरतो.

  • सकाळच्या वेळेस २०-३० मिनिटं टाळया वाजवल्यास तुम्ही फीट आणि अ‍ॅक्टिव्ह राहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असा सल्ला डॉक्टर देतात.

टाळी वाजवल्यानंतर कोणत्या ५ अ‍ॅक्युपंचर पॉइंटला चालना मिळते ?

  •  हँड वॅली पॉइंट (Hand valley point)

  •  बेस ऑफ थंब पॉइंट अर्थात अंगठय़ाच्या खालचा भाग (Base of thumb point)

  •  रिस्ट पॉइंट – मनगट (Wrist point)

  • इनर गेट पॉइंट (Inner gate point)

  • थंब नेल पॉइंट – अंगठय़ाचं नख (Thumb nail point)

Clapping Therapy
Diabetes Care : मधुमेहामुळे पायाला येणाऱ्या सूजेवर 'या' 5 तेलांचा रामबाण उतारा; एकदा वापरुन पाहाच

या पाच पॉइंट्सला चालना दिल्यास खालील फायदे होतात–

·   हृदयाच्या आणि फुप्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.

·   पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.

·   गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.

·   लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.

·   टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.

·   क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.

·   क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.

·   क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.

·   मधुमेह, अथ्र्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश, केसगळती, डोळ्यांचे विकार यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते.

·  सतत एसीमध्ये बसून काम करणा-यांमध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com