Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी आहारात करा 'या' लाडूचा समावेश

प्रथिने आणि फायबर समृद्ध असलेल्या चीया, भोपाळा, टरबूज, आणि अंबाडी बियांचा मुख्यता: आहारात समावेश करावा.
Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी आहारात करा 'या' लाडूचा समावेश
LadduDainik Gomantak

ज्या लोकांना वजन कमी (Weight loss) करायचे आहे, त्यांनी प्रोटीन (Protein), फायबर, (Fiber), कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) , मिनरल्ससह (Minerals) इतर अनेक पोषक घटकांनी (Nutrients) समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. नियमितपणे योगा आणि सकस आहार (Food) घेतल्यास वजन कमी (Weight loss) होऊ शकते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी तुम्ही लाडूचा( Laddu) आहारात समावेश करू शकता. प्रथिने आणि फायबर समृद्ध असलेल्या चीया,भोपाळा, टरबूज, आणि अंबाडी बियांचा मुख्यता: आहारात समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही या पासून तयार केलेले लाडू खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया या लाडूंची रेसिपी.

* लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

चिया बियाणे - 1 कप

भोपळा बियाणे - 1 कप

टरबूज बियाणे - 1 कप

अंबाडी बियाणे - 1 कप

तूप - 1/2 कप

ओट्स - 2 कप

ड्राय फ्रूट्स

अर्धा कप गूळ

* लाडू बनवण्याची पद्धत

सर्वात प्रथम एका पॅनमध्ये सर्वप्रकारची बियाणे भाजून घ्यावीत. नंतर ते थंड करायला ठेवावे. तर एकीकडे तुपात ओट्स फ्राय करून घ्यावे. जेव्हा ओट्स चांगले फ्राय झाले की काढून घ्यावे. त्यात आता काजू, मनुका आणि गूळ पावडर टाकावे. हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावे. यानंतर सर्व बीया बारीक करून या मिश्रणात मिक्स करावी. यानंतर लाडू तयार करण्यासाठी हाताला थोडे तूप लावून लाडू तयार करावे. यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही. लाडू तयार झाल्यानंतर हवा बंद डब्ब्यात ठेवावे.

* अंबाडीच्या बिया

अंबडीच्या बियांमध्ये ओमेगा 3फॅटी ॲसिड, प्रथिने, आहारातील फायबर, व्हिटॅमिन बी -6, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक असतात. नियमितपणे अंबाडीच्या बियांचे सेवकण केल्याने कोलेस्टेरॉल आणि शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

* चीया बियाणे

चीया बियाणे सुपर फूड म्हणून ओळखल्या जाते. यात प्रथिने , कॅल्शियम, लोह मुबलक प्रमाणात असतात. चीया बियाणे नियमित वापरल्याने शुगर वाढण्याची शक्यता कमी होते. यामुळे हृदयाचे विकार कमी होण्यास मदत मिळते.

* भोपल्याच्या बिया

भोपल्याच्या बियामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आपल्या शरीराची पचनसंस्था सुरळीतपाने काम करते. याशिवाय अनेक आजरांपासून दूर ठेवते.

* टरबूजच्या बिया

टरबुजच्या बियामध्ये मॅग्नेशियम, जिंक आणि लोह असते. या बियांचे नियमित सेवन केल्याने हृदय आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच पचनक्रिया सुरळीत होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com