राजस्थान फिरायचंय? मग भारतीय रेल्वेच्या या पॅकेजेसचा नक्की विचार करा

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

जर आपण राजस्थानातील उदयपूर, जैसलमेर किंवा जयपूरसारख्या शहरांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे.
 

फेब्रुवारी महिना जवळपास संपत आला आहे आणि यावेळी जास्त थंडी किंवा जास्त ऊन नाही. असं म्हणतात,  राजस्थान फिरण्यासाठी ही सगळ्यात चांगली वेळ आहे. जर आपणही राजस्थानातील उदयपूर, जैसलमेर किंवा जयपूरसारख्या शहरांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. वास्तविक, आयआरसीटीसीने शहर आणि बजेटनुसार बरेच पॅकेजेस जाहिर केले आहेत, ज्याद्वारे आपण राजस्थानमध्ये सहज फिरू शकता.

आयआरसीटीसीने सुरू केलेल्या या पॅकेजसमध्ये राजस्थानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरण्याची संधी दिली जात आहे. बर्‍याच पॅकेजेसमध्ये एकापेक्षा जास्त शहरे आहेत, ज्यासाठी आपल्याला थोडेसे जास्त पैसे मोजावे लागतील. या पॅकेजेसमधील खास गोष्ट म्हणजे आपल्याला एकदा पैसे द्यावे लागतील, त्यानंतर आपल्याला हॉटेल्स, प्रवास याची कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि आपले बुकिंग वेळेआधीच केलेल असेल. चला जाणून घेऊया 8 हजार ते 14 हजारांच्या अशा पॅकेजेसविषयी, ज्याद्वारे आपण राजस्थानमध्ये कमी खर्चात फिरू शकता.

जोधपूर - जैसलमेर, बीकानेर, जोधपूर

या पॅकेजमध्ये आपणांस जोधपूर, जैसलमेर, बीकानेर असं फिरायला मिळेल. तेथे 3-दिवस रात्र आणि 4-दिवसाचे पॅकेज असेल आणि आपण तीन शहरे फिरवाल. जर आपण दोन लोकांसाठी पॅकेज बुक केले तर आपल्याला प्रति व्यक्ती 13265 रुपये द्यावे लागतील आणि तीन लोकांसाठी बुकिंग केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 10265 रुपये द्यावे लागतील.

जयपूर-अजमेर-पुष्कर-उदयपूर-जयपूर

या पॅकेजमध्ये आपणास जयपूर, अजमेर, पुष्कर, उदयपूर असे फिरवले जाईल आणि पुन्हा जयपूरला सोडले जाईल. याद्वारे जयपूरपासून सुरू होणारा प्रवास जयपूरमध्येच संपेल आणि ते एकूण 4 रात्री आणि 5 दिवसांचे आहे. जर आपण दोन लोकांसाठी पॅकेज बुक केले तर आपल्याला प्रति व्यक्ती 14745 रुपये द्यावे लागतील आणि तीन लोकांसाठी बुकिंग केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 10780 रुपये द्यावे लागतील.

जैसलमेर - वाळवंट सफारी

हे पॅकेज फक्त जैसलमेरसाठी आहे. यात आपल्याला 2 रात्री आणि 3 दिवसांसाठी 8305 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, जर तुम्ही तीन लोकांसाठी बुकिंग केले तर तुम्हाला एका माणसासाठी 6320 रुपये द्यावे लागतील.

उदयपूर-कुभलगड

जैसरमेरसारखंच हे पॅकेज फक्त उदयपुरचे आहे. तेथे 2 रात्री आणि 3 दिवसांचे हे पॅकेज असेल. त्यात केवळ उदयपूर आणि कुंभलगड फिरविले जातील. जर आपण दोन लोकांसाठी पॅकेज बुक केले तर तीन दिवसांच्या या पॅकेजसाठी आपल्याला फक्त 8475 रुपये मोजावे लागतील.

संबंधित बातम्या