Home Decor Ideas: 'या' झाडांमुळे घराला मिळेल मस्त लुक

Lifestyle Tips: घराची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही ही झाडे लावू शकता.
Home Decor Ideas: 'या' झाडांमुळे घराला मिळेल मस्त लुक
Home Decor IdeasDainik Gomantak

घराची सजावट करण्यासाठी तुम्ही विविध वस्तूंचा वापर करता. पण तुम्हाला माहिती आहे का घरात सुख-संपत्ती आणि समृद्धी येण्यासाठी झाडे लावणे देखील फायदेशीर ठरते. जाणून घेऊया तुमचे घर सुंदर बनवणारे झाडे कोणती आहेत. (Home Decor Ideas news)

* मनी प्लांट

मनी प्लांट घरामध्ये ठेवणे शुभ मानले जाते. हे रोप घरात लावल्याने सुख शांती वाढते. त्याची हिरवी पाने डोळ्यांना सुखावतात. तुम्ही हे झाड टेबलवर सजावट करून ठेवी शकता.

* बांबूचे झाड

बांबूच्या झाडाला लकी बांबू प्लांट म्हणतात. बांबू घरात संपत्ती, समृद्धी, सौभाग्य आणि शांती आणते. घरातील बांबूचे झाडही हवा शुद्ध करण्याचे म्हणून काम करते. काचेच्या बाटलीत तुम्ही हे झाड घरात ठेवू शकता.

* पीस लिली

इनडोअर प्लांट्समध्ये पीस लिली ही खूप चांगली वनस्पती आहे. तो दिसायला हिरवा आणि सुंदर दिसतो. लिलीमुळे तुमचे घर सुगंधाने भरेल. हे झाड शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

Home Decor Ideas
ऑफिसमध्ये काम करताना टेंशन फ्री राहण्यासाठी वापरा 'या' 5 भन्नाट ट्रिक्स

* शेवंती

शेवंती वनस्पती ही अतिशय सुंदर वनस्पती आहे. याची पिवळी फुले खूप मोठी आणि सुंदर दिसतात. हिवाळ्यात या रोपावर फुले येतात, त्यामुळे तुम्ही ती घरातही ठेवू शकता.

* गिलोय

गिलोय आणि कोरफड या दोन्ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहेत. कोरफड आणि गिलोय यांचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. गिलोयची वेल खूप सुंदर दिसते. दुसरीकडे, कोरफड तुमची त्वचा आणि केस सुंदर बनवते. कोरफड देखील हवा शुद्ध करण्याचे काम करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.