International Widows Day 2022: मानवी कलंकाविरूद्धचा लढा

Goa: गोव्यातली ‘वी’ (we) ही संघटना देखील विधवांच्या विटंबणेचा विषय घेऊन पुढे सरसावली आहे.
International Widows Day 2022: मानवी  कलंकाविरूद्धचा लढा
International Widows DayDainik Gomantak

दरवर्षी 23 जून हा जगभर ‘विधवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. विकसनशील देशातल्या अनेक विधवांप्रमाणेच विकसीत देशातल्या विधवांची परिस्थितीही बहुधा फरक करण्याजोगी नसते. हिंसा, सामाजिक कलंक इत्यादी बाबीना अनेकांना समान तीव्रतेनेच सामोरे जावे लागते. (International Widows Day 2022 news)

आपल्या गोव्यातला (Goa) समाज सुशिक्षित मानला गेला असला तरी इथल्या विधवानांही अवहेलनेला सामोरे जावे लागते. हे सत्य काही आता लपून राहीलेले नाही. रुढी-परंपरांमुळे विधवांना (Widows) ज्या मानसिक दबावातून जावे लागते. त्याविरुद्‍ध गोव्यातल्या अनेक पंचायतीनी पुढे सरसावत ज्या तऱ्हेने ह्या रुढी परंपरांविरुद्‍ध ठराव मंजूर केले आहेत. ते पाहता विधवांना, आपण ज्याला प्रगतीशील म्हणतो अशा या काळात देखील, कोणत्या परिस्थितीतून जावे लागले असेल याची कल्पना येते.

अलिकडे उगे (सांगे) लोलये (काणकोण), तिवरे-वरगांव, वेलींग-प्रियोळ (फोंडा) या पंचायतीनी ठराव घेऊन विधवांना क्रूर वागणूक देणाऱ्या या परंपरांना तिलांजली देण्याचा निश्चय केला. त्याही पुर्वी शिरोडा, धारबांदोडा, साकोर्डा, कुळे-शिगांव, धारगळ आणि कोरगांव या पंचायतीनीही विधवांचे दमन करणाऱ्या या अनिष्ट चालरीतींच्या विरुद्‍ध ठराव घेतला होता. गोव्यात अशातऱ्हेच्या प्रागतीक विचारांना जी चालना मिळाली आहे आणि अनेक ठिकाणांहून जो प्रतिसाद या मोहीमेला लाभतो आहे तो खूपच स्वागतार्ह आहे.

International Widows Day
Goa Monsoon Trip: गोव्याला पावसाळ्यात जायचा विचार करत असाल, तर 'या' रेस्टॉरंट्सला नक्की भेट द्या

गोव्यात देखील अशा अनेक स्त्रीया (Women) आहेत ज्यांनी, त्या ग्रामीण भागातल्या असूनसुद्‍धा अशाप्रकारच्या रुढी-परंपरांचे लोंढणे आपल्या गळ्यात बांधू घ्यायला साहसपूर्वक नकार दिला. इतकेच नाही तर त्यानी वैयक्तिक पातळीवर इतरांनाही अशा कुप्रवृत्ती विरुद्‍ध एकत्र करून त्यांना लढण्यास प्रवृत्त करायचाही प्रयत्न केला.

गोव्यातली ‘वी’ (we) ही संघटना देखील विधवांच्या विटंबणेचा विषय घेऊन पुढे सरसावली आहे. वेगवेगळ्या समाजकर्त्यांवरवी, राजकर्त्यांवरवी पंचायतीला त्यानी यासंबधी ठराव आणण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रयत्नांना साकारात्मक असा प्रतिसादही लाभलेला आहे.

मृत नवऱ्याला स्मशानात नेताना विधवांची केली जात असलेली विटंबणा हा एक विषय आहे. परंतु याच विषयाची पुढची बाजू अशी आहे की नंतरही विधवांना अनेक, प्रसंगी हीन वागणूक दिली जाते. किबहूना पुढचे सारे आयूष्य त्यांना, आपल्याच कुटुंबात ‘दुय्यम’ बनून सारावे लागते. अनेक दबावांना तोंड देत दिवस ढकलावे लागतात. त्याबद्‍लही विचार होणे गरजेचे आहे. जिथे मागासलेली प्रवृत्ती मनावर आरुढ होऊन असते तिथे. शहरी आणि ग्रामीण असा भेद करुन काही उपयोग नाही. दोन्हीकडच्या स्त्रियांचे भोग तशा वातावरणात समानच राहतात.

केवळ पंचायतीत ठराव पास करुन ही विटंबणा थांबवण्याचे प्रयत्न आपापल्या क्षेत्रापुरते होणे हे देखील पुरेसे नाही. जोपर्यंत अशा रुढी-आचारांविरुद्‍ध कायदा होत नाही तोपर्यन्त (आणि त्यानंतरही) समाजानेच अशा परंपरांविरुद्‍ध ‘दबाव गट’ बनून राहणे जरुरीचे असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com