लहान बाळांसाठी बदाम तेल किती फायदेशीर
Is almond oil beneficial for babyDainik Gomantak

लहान बाळांसाठी बदाम तेल किती फायदेशीर

बाळांची त्वचा अतिशय नाजुक असते.

ज्या घरांमध्ये लहान मुले (Baby) आहेत, तिथे लहान मुलांची मालिश केली जाते. अनेक घरांमध्ये लहान मुलांची मालीश तुपाने केली जाते. तर अनेक घरांमध्ये मोहरीचे तेल आणि ऑलिव्ह ऑईलने ( Olive oil) केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का बदाम तेलाची (Almond oil) मालीश देखील लहान मुलांसाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचे अनेक फायदे आज जाणून घेवूया, तुम्ही सुद्धा लहान मुलांची बादाम तेलाने मालीश करायला सुरुवात करू शकता. कारण बाळांची त्वचा (Skin) अतिशय नाजुक असते. म्हणून इतर संसर्गापासून बचाव करण्यासाठी अतिरिक्त पोषण आवश्यक आहे. बाळाचे पोषण करण्यासाठी बदामाचे तेल वापरावे. चला तर मग जाणून घेवूया बदाम तेलाचे फायदे.

* त्वचा चांगली राहते

लहान बाळाची त्वचा आपल्या त्वचेपेक्षा अधिक नाजुक असते. म्हणूनच लहान बाळांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तेलाची मालीश करणे आवश्यक असते. यासाठी बदाम तेलाचा वापर करावा. बदाम तेल त्वचेसाठी फायदेशीर असते.

* नैसर्गिक पोषक घटक

ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आपण अन्न घेतो. यात सकस आहाराचा समावेश करावा. ओलेइक अॅसिड आणि लिनोलिक अॅसिडने समृद्ध असते. बदाम तेल हे शरीरासाठी पोषक असते असे मानले जाते. यामुळे त्वचा चांगली राहते. तसेच त्वचा मऊ ठेवण्याचे काम करते.

Is almond oil beneficial for baby
ही फळं आणि भाज्या ऑक्सीजनने समृद्ध

* त्वचेचा कोरडेपणा कमी होते

जेव्हा बाल आईच्या पोटात असत, तेव्हा ते सर्व प्रकारच्या वातावरणांपासून दूर असते. पण जन्मानंतर कोणत्याही प्रकारचा बदल पटकन स्वीकारण्यास सक्षम नसते. अशावेळी बाळाची त्वचा कोरडी पडते, म्हणून तेलाची मसाजकरणे आवश्यक असते. बदाम तेलामध्ये फॅटी अॅसिड जीवनसत्त्वे ए, ई त्वचेचा कोरडेपणा दूर करतात. त्वचा मऊ राहण्यासाठी बदाम तेल फायदेशीर ठरते.

* स्नायू

लहान बाळांची तेलाने मालीश केल्याने स्नायू बळकट होतात. तसेच शरीरातील रक्तभिसरण चांगले होते. मालीश केल्याने स्नायू बळकट होऊन बाळाची योग्य वाढ होते. बदाम तेलामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे यासारखे पोषक घटक असतात.

Related Stories

No stories found.