हिवाळ्यात किन्नुचा रस पिणे आरोग्यदायी

ग्लुकोज (Glucose) , फ्रक्टोज (Fructose), सुक्रोज आणि कार्बोहाइड्रेटने समृद्ध असलेले हे हिवाळ्यातील फळ आरोग्यदायी आहे.
हिवाळ्यात किन्नुचा रस पिणे आरोग्यदायी
हिवाळ्यात किन्नुचा रस पिणे आरोग्यदायी Dainik Gomantak

हिवाळ्यात अशी अनेक फळे यायला लागतात ज्यांची आपण बराच वेळ वाट पाहतो. यापैकी एक फळ म्हणजे किन्नु . अनेकदा लोक किन्नु आणि संत्री यांच्यात फरक करू शकत नाहीत. जरी ही दोन्ही फळे एकाच सिट्रिक कुटुंबातील असली आणि हिवाळ्यात ती बाजारात उपलब्ध असतात. संत्री आणि किन्नु चवीला आंबट-गोड असते. तर किन्नु चवीला आंबट नसते. यामुळे त्याचा रस प्यायला खूप चवदार असतो. ग्लुकोज (Glucose) , फ्रक्टोज (Fructose), सुक्रोज आणि कार्बोहाइड्रेटने समृद्ध असलेले हे हिवाळ्यातील फळ आरोग्यदायी आहे. या फळांचा रस रोज पिल्याने अनेक फायदे होतात.

एनर्जी:

किन्नुमध्ये भरपूर प्रमाणात ग्लुकोज असते जे ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहे. सकाळची सुरुवात एक ग्लास ताज्या किन्नुच्या रसाने केल्यास तुम्ही दिवासभर सक्रिय राहता. ते तुमच्या शरीराला भरपूर एनर्जी निर्माण करते.

* पचन

तुमची पचन संस्था जर कमकुवत असेल किंवा बद्धकोष्ठता आणि जुलाबसारख्या समस्या असेल तर किन्नुचा रस तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी असू शकते. हे पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी ओळखले जाते. किन्नुचा रस लवकर पचतो आणि पचन प्रक्रिया सुधारते. ज्यांना पोटासंबंधित समस्या आहेत, त्यांनी नियमितपणे किन्नुच्या रसाचे सेवन करावे.

हिवाळ्यात किन्नुचा रस पिणे आरोग्यदायी
लहान मुलांना ही 5 सोशल स्किल शिकवली पाहिजेत

* ऍसिडिटी

हिवाळ्यात अनेक लोक खूप तेलकट पदार्थ खातात. यामुळे अनेकांना ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होते. जेवणानंतर एक ग्लास किन्नुचा रस प्यायल्याने ऍसिडिटी आणि छातीत होणाऱ्या जळजळीपासून मुक्ती मिळते. फळांमध्ये खनिजे असतात ,ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात.

* कर्करोग

किन्नुमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. हे एचआयव्हीचा संसर्ग गोणयाचा धोका कमी करण्यास मदत करण्यासाठी देखील ओळखले जातात. कीन्नुचा रस प्यायल्याने शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर निघून जातात.

* मजबूत हाडे

कीन्नुमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते. यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. कीन्नुचा रस प्यायल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढण्यास मदत मिळते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com