फेस सिराम खरेदी करतांना 'या' गोष्टी ठेवा लक्षात
Face Serum Dainik Gomantak

फेस सिराम खरेदी करतांना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी सिरमचा (Face Serum) वापर करणे फायदेशीर ठरते.

हिवाळ्यात (Winter) त्वचेची काळजी घेण्याची गरज असते. कारण हिवाळ्यात त्वचा अधिक कोरडी पडते. यामुळे फेस सिरमचा (Face Serum) वापर केल्याने त्वचा (Skin) चांगले राहते. तसेच सिराम एंटी एजंट म्हणून देखील काम करते. पण सिरम खरेदी करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत.

* ऑल इन वन सीरम

जर तुम्हाला सीरम (Serum) वापरायचा असेल तर ऑल इन वन सीरम वापरावे. त्यात हायलुरोनिक ऍसिड, ग्लायकोलिक ऍसिड, रेटिनॉल आणि व्हिटॅमिन सी सारखे गुणधर्म आहेत. हे सर्व प्रकारच्या त्वचेच्या योग्य आहे. तसेच, एकाच वेळी अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. जर तुमची त्वचा (Skin) खूप संवेदनशील असेल तर तुम्ही ते वापरण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Face Serum
काढ़ा बनवताना तुम्ही 'ही' चूक करताय का?

* पॅच टेस्ट करावी

त्वचेवर कोणतेही क्रीम किंवा सीरम वापरण्यापूर्वी थोडे त्वचेवर लावून टेस्ट करावी. प्रत्येकवेळी ब्युटि प्रॉडक्ट तुमच्या त्वचेवर सूट होईलच असे नाही. एकदा तुम्ही पॅच टेस्ट केल्यानंतर तुमच्या त्वचेसाठी (Skin) सीरम योग्य आहे यांची खात्री करणे तुमच्यासाठी सोपे होईल.

* डार्क स्पॉट्ससाठी

जर तुमच्या त्वचेवर काळे दाग पडत असेल तर तुम्ही बी3 असलेले सिराम वापरावे. काळे डाग दूर करण्यासाठी ते तुमच्या त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवते.

* सिरामचा वापर करणे सुरू केल्यावर तुम्हाला काही काल प्रतीक्षा करावी लागेल. कारण नवीन त्वचेच्या पेशी तयार होण्यासाठी सुमारे 28 दिवस लागतात. त्यामुळे संयमाने त्याचा नियमित वापर करावा.

* सीरम वापरण्याची पद्धत

चेहरा (Face) सर्वात पहिले स्वच्छ करावा, नंतर टोनर वापरावे. यानंतर सिराम वापरावे. सिराम लावताना हाताच्या दोन बोटांनी लावावे. दिवसा सिराम लावल्यानंतर सनस्क्रीन (Sunscreen) लावावे आणि रात्री सिरम लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com