Long Covid: दीर्घ कोविडमुळे होऊ शकतो मूत्राशयचा गंभीर आजार
kidney problems with long CovidDainik Gomantak

Long Covid: दीर्घ कोविडमुळे होऊ शकतो मूत्राशयचा गंभीर आजार

रुग्णालयात दाखल कोविड रूग्ण आणि अगदी सौम्य लक्षणे (symptoms) असणाऱ्यांनाही किडनीचे विकार आणि शेवटच्या टप्प्यातील किडनी रोग (ESKD) होण्याची शक्यता आहे.

कोरोनाने (corona) जगात हाहाकार माजवला आहे, कोरोना जरी बरा होणारा रोग त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होत आहेत, त्यातून जर तुम्ही दीर्घ कोविडमुळे ग्रस्त असाल तर तुम्हाला मूत्रपिंडाच्या समस्यांना (kidney problems with long Covid) सामोरे जावे लागते असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

"म्हणूनच लोकांनी वेळीच जागरूक होऊन वेळेवर तपासणी केली पाहिजे या मध्ये आपल्याला मूत्रपिंडाच्या कार्याची टक्केवारी कळून येते सोबतच ईजीएफआर आणि मूत्रात प्रथिने गळतीचे प्रमाण या तपासणी मधून कळते, जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की रुग्णालयात दाखल कोविड रूग्ण आणि अगदी सौम्य लक्षणे (symptoms) असणाऱ्यांनाही किडनीचे विकार आणि शेवटच्या टप्प्यातील किडनी रोग (ESKD) होण्याची शक्यता आहे.

kidney problems with long Covid
Ganesh Festival 2021: गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी

असे का होते?

वॉशिंग्टन विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकात एमडी म्हणाले, “कोविड -19 hospital साठी रुग्णालयात दाखल झालेल्या किंवा आयसीयू सेवेची गरज असलेल्या लोकांना सर्वाधिक धोका असतो.” “परंतु ज्यांना सौम्य लक्षणे होती त्यांना सुद्धा धोका आहे. मूत्रपिंडात वेदना होणे, मूत्रपिंडाचे काम व्यवस्थित न होणे, "मूत्रपिंडाच्या सहभागाची अचूक यंत्रणा अस्पष्ट असली तरी, सेप्सिसमुळे सायटोकाईन स्टॉर्म सिंड्रोम होऊ शकतो किंवा व्हायरसमुळे थेट सेल्युलर इजा होऊ शकते ज्यामुळे तीव्र ट्यूबलर नेक्रोसिस किंवा ट्यूब्युलोइन्टरस्टिटियल नेफ्रायटिस होऊ शकते," असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

मूत्रपिंड कोविड

दीर्घकालीन मूत्रपिंडाचा रोग मूत्रपिंड निकामी करू शकतो.

लांब कोविडमधून बरे झालेल्यांसाठी तज्ञांनी काय सुचवले आहे ते येथे आहे

सौम्य कोविड आजाराने घरी उपचार घेतलेल्या रुग्णांना किडनीची काही समस्या निर्माण होऊ शकते परंतु लक्षणे दिसू शकत नाहीत. म्हणूनच, पुरेशी लघवी न करणे, गुडघे, पाय आणि डोळ्यांभोवती सूज येणे, थकवा, श्वास लागणे, गोंधळणे, मळमळ, दौरे किंवा कोमा, छातीत दाब किंवा वेदना यासारख्या लक्षणांकडे नेहमी लक्ष द्या.

kidney problems with long Covid
Vastu Tips: गळणाऱ्या नळाची वेळेवर दुरुस्ती करा अन्यथा होतील हे दुष्परिणाम

कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे?

तुम्हाला अश्या प्रकारची लक्षणे असतील तर त्याच्याकडे कानाडोळा न करता लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. सर्व रुग्णांनी नियमितपणे किडनीचे योग्य कार्य निश्चित करण्यासाठी क्रिएटिनिन चाचणी करावी, तथापि, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या दीर्घकालीन स्थिती असलेल्या रुग्णांच्या मूत्रपिंड आधीच कमी क्षमतेने कार्य करत असल्याने या रुग्णांनी जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com