Mixed Fruit Jam Recipe: मुलांसाठी घरीच बनवा हेल्दी फ्रूट जॅम

Mixed Fruit Jam: हेल्दी मिक्स फ्रूट जॅम बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया.
Mixed Fruit Jam Recipe: मुलांसाठी घरीच बनवा हेल्दी फ्रूट जॅम
Mixed Fruit Jam RecipeDainik Gomantak

आज आम्ही तुम्हाला घरी बनवलेल्या हेल्दी फ्रूट जॅमची रेसिपी सांगणार आहोत. जे तुम्ही फळांच्या मदतीने कोणत्याही प्रिझर्वेटिव्हशिवाय हेल्दी पद्धतीने बनवू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्यानुसार बदल करून मुलांसाठी जे काही फळ आरोग्यदायी असेल ते घालू शकता. चला तर मग जाणून घेऊ या हेल्दी मिक्स फ्रूट जॅम बनवण्याची रेसिपी. जेणेकरून बाजारातील रेडीमेड जाम सोडून तुमच्या हाताने बनवलेल्या जॅमचा आनंद तुमच्या मुलांना घेता येईल. (Mixed Fruit Jam Recipe News)

मिक्स फ्रूट जॅम बनवण्यासाठी लागणारे साहित्य
6 सफरचंद
1 पपई
1 किलो द्राक्ष
3 केळी
1 छोटा अननस
1 टीस्पून लिंबाचा रस
7 टीस्पून सायट्रिक आम्ल
1 किलो साखर
थोडं मीठ

Mixed Fruit Jam Recipe
Ayurveda Diet Tips: आयुर्वेदानुसार रात्रीच्या जेवणात 'या' पदार्थांचे करावे सेवन

होम मेड फ्रूट जॅम कसा बनवावा
हा जॅम बनवण्यासाठी आधी पपई, सफरचंद आणि अननस सोलून घ्या. आता या फळांचे छोटे तुकडे करा. आता गॅसवर एक भांडे ठेवा आणि त्यात सफरचंद, पपई, द्राक्षे आणि अननस उकळा. उकळी आल्यावर सर्व फळे काढून थंड करा, नंतर मिक्सरमध्ये केळी, द्राक्ष आणि लिंबाचा रस घालून चांगले वाटून घ्या. गुळगुळीत पेस्ट तयार होईपर्यंत ते बारीक करा.

आता गॅसवर पॅन गरम करून त्यात सर्व फळांचा लगदा घालून साखर व मीठ मिक्स करावे. आता मंद आचेवर शिजवा. नंतर त्यात सायट्रिक ऍसिड टाका आणि 2 मिनिटे मंद आचेवर ढवळत राहा. आता चमच्याच्या मदतीने हे मिश्रण थोडे घट्ट झाले आहे की नाही ते पहा. नंतर थंड झाल्यावर जाम काचेच्या बरणीत ठेवा. तुम्ही फ्रीजमध्ये देखिल ठेवू शकता. घरी घ्या चविष्ट फ्रूट जॅमचा आस्वाद.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com