Kitchen Hacks: फ्रीजमध्ये ठेवलेल्या 'या' पदार्थांचे सेवन टाळावे

कोणते खाद्यपदार्थ आहेत ज्यांना सामान्य तापमानात ठेवणे आवश्यक आहे.
Kitchen Hacks
Kitchen HacksDainik Gomantak

बहुतेक लोक खाद्यपदार्थ खराब होण्याच्या भीतीमुळे बराच वेळ फ्रीजमध्ये ठेवतात. पण काही पदार्थ असे असतात जे फ्रीजमध्ये कमी तापमानात ठेवावे लागतात. जेणेकरून पदार्थ जास्त काळ चांगले राहतात. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सामान्य तापमानात ठेवता येतात. चला तर मग जाणून घेऊया कोणते खाद्यपदार्थ आहेत ज्यांना सामान्य तापमानात ठेवणे आवश्यक आहे. (Foods in Refrigerator News)

* टोमॅटो
जर टोमॅटो कच्चा असेल तर त्यांना सामान्य तापमानात ठेवावे. जेणेकरून ते बाहेरील वातावरणात त्यांची चव आणि पिकण्याची प्रक्रिया हळूहळू पूर्ण करू शकतील. जे रेफ्रिजरेटरमध्ये शक्य नाही.

* कांदे
नेहमी सोलून न काढता सामान्य तापमानात बाहेर ठेवावेत. हे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांच्यामध्ये ओलावा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे ते खराब होऊ शकतात. तर सोललेले कांदे फ्रीजमध्ये ठेवता येतात.

* सुकामेवा
बरेच लोक सुकामेवा (Dry Fruits) जास्त काळ टिकण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात. सुकामेवा फ्रीजमध्ये ठेवलेल्या इतर गोष्टींचा वास शोषून घेतात, ज्यामुळे त्यांची चव बदलते.

Kitchen Hacks
Cooking Tips: मुलांसाठी बनवा कलरफुल अन् स्वादिष्ट 'फ्रुट सँडविच'

* लसूण
फ्रीजमध्ये ठेवल्याने ते रबरासारखे बनते. त्यामुळे त्यांना फक्त सामान्य तापमानावर ठेवा.

* मध
पा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. ते गोठते आणि स्फटिक बनते. मध सामान्य तापमानात ठेवून त्याचा वापर करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com