Kitchen Tips: चॅापिंग बोर्ड खरेदी करतांना घ्यावी ही काळजी

अनेक वेळा लोकं विचार न करता दिसायला चांगले असणारे चॉपिंग बोर्ड (Chopping Board) खरेदी करतात.
Kitchen Tips: चॅापिंग बोर्ड खरेदी करतांना घ्यावी ही काळजी
Kitchen Tips: Buy the right chopping boardDainik Gomantak

चॉपिंग बोर्ड (Chopping Board) खरेदी करणे आपल्याला सोपे वाटते. पण योग्य चॉपिंग बोर्ड निवडल्यास भाजी कापण्यासाठी कमी वेळ लागतो. स्वयंपाक करतांना सर्वात महत्वाचे काम म्हणजे भाज्या कापणे. हे काम चॉपिंग बोर्डच्या मदतीने त्वरित पूर्ण झाले तर यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. बऱ्याच वेळा लोक विचार न करता दिसायला चांगले असणारे चॉपिंग बोर्ड (Chopping Board) खरेदी करतात. पण असे चुकीचे आहे. चॉपिंग बोर्ड खरेदी करतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेवूया.

Dainik Gomantak

* चॉपिंग बोर्डचे अनेक प्रकार

* प्लास्टिक चॉपिंग बोर्ड

प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड किमतीने स्वस्त असते. पण जर तुम्हाला भाज्या चिरण्यासाठी या चॉपिंग बोर्डची सवय असेल तर ही वाईट गोष्ट आहे. प्लास्टिक बोर्डचा वापर करणे टाळावे. कारण प्लास्टिक बोर्ड काही दिवसानी खराब होऊ शकते.

* लाकडी चॉपिंग बोर्ड

जर तुम्ही चांगले लाकूड विकत घेवूण बोर्ड बनवले तर चॉपिंग बोर्ड अधिक काळ टिकू शकते. कारण लाकूड चांगल्या दर्जाचे असते. हे चॉपिंग बोर्ड दैनंदीन वापराने खराब होणार नाही.

Kitchen Tips: Buy the right chopping board
Kitchen Hacks: जुन्या स्टीलच्या ग्लासपासून तयार करा फ्लॉवर पॉट

* बांबू चॉपिंग बोर्ड

बांबू चॉपिंग बोर्ड वापरायला सोईस्कर असते.पण हे चॉपिंग बोर्ड दैनदीन वापराने खराब होऊ शकते. त्याचा योग्य वापर न केल्यास हे चॉपिंग बोर्ड लवकर खराब होते.

चॉपिंग बोर्ड खरेदी करतांना चांगल्या बोर्डची निवड करावी. चॉपिंग बोर्ड खरेदी करतांना त्याचा पोत लक्षात ठेवा. कारण जर त्याची पोत चांगली असेल तर भाज्या कापतांना सोपे जाते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com