फ्रोझन फूड खाताय ? आधी जाणून घ्या त्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

जच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाही. लोक स्वयंपाक करण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत. परंतु झटपट काही बनवायचे असेल, तर खायचे असेल तर फ्रोझन फूड्सचा पर्याय आहे.

जच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाही. लोक स्वयंपाक करण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत. परंतु झटपट काही बनवायचे असेल, तर खायचे असेल तर फ्रोझन फूड्सचा पर्याय आहे. बर्‍याच लोकांनी याचा वापर करण्यास सुरवात केली आहे, परंतु हे फोझनम म्हणजेच गोठवलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. वास्तविक, हे गोठलेले पदार्थ बनवताना अशा अनेक गोष्टी वापरल्या जातात ज्या तुमच्या शरीराला हानी फ्रोझन फूड खाणं बर्‍याच रोगांना कारणीभूत ठरू शकते. गोठवलेल्या पदार्थांमुळे आपल्या आरोग्याला कशी हानी पोहोचू शकेल हे जाणून घेऊ

या गोष्टी पदार्थ गोठवण्यासाठी वापरल्या जातात

गोठवलेले पदार्थ बरेच दिवस खराब होत नाहीत आणि ते ताजे देखील दिसतात, त्यांची चव वाढविण्यासाठी, त्यात स्टार्चचा वापर केला जातो. जे मधुमेहाच्या रूग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. हायड्रोजनेटेड पाम ऑइल गोठवलेल्या पदार्थांमध्ये देखील वापरलं जातं. यात ट्रान्स फॅट्सदेखील असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. गोठलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे आरोग्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात.

फ्रोझन फूड जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे उद्भवू शकतात या समस्या

गोठवलेल्या पदार्थांमध्ये असलेल्या ट्रान्स फॅट्समुळे रक्तवाहिन्यांची समस्या वाढते. ट्रान्स फॅट्स शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवतं, समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत हृदयाच्या पेशंटसाठी हे खूप धोकादायक ठरू शकते. गोठविलेले पदार्थ, विशेषत: गोठवलेल्या मांसामुळे स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते. या व्यतिरिक्त इतरही अनेक समस्या असू शकतात. गोठलेल्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीनपेक्षा कॅलरीजचं प्रमाण दुप्पट असतं. ज्यामुळे वजन वाढू शकतं.

संबंधित बातम्या