आठवड्यातून एकदा करा Watermelon Facial आणि चेहरा बनवा चमकदार!

Watermelon Facial Benefits : कलिंगडमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्याचे काम करतात.
Watermelon Facial Benefits
Watermelon Facial BenefitsDainik Gomantak

उन्हाळ्यात कलिंगडचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. कलिंगड केवळ जिभेची चवच वाढवत नाही तर चेहऱ्याची चमक वाढवण्याचेही काम करते. कलिंगडमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्याचे काम करतात. कलिंगडचे थंड आणि हायड्रेटिंग गुणधर्म चेहऱ्यासाठी खूप चांगले मानले जातात. अशा स्थितीत फेशियल प्रमाणे लावल्यास चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक परत येऊ लागते. कलिंगड फेशियल कसे करावे याच्या पद्धती येथे आहेत, जे तुम्ही घरी सहज करू शकता. (Watermelon Facial Benefits)

Watermelon Facial Benefits
सिंगापूरमध्ये 'द काश्मीर फाइल्स'वर बंदी; धार्मिक सलोखा बिघडवल्याचा आरोप

खाली दिल्याप्रमाणे आपण कलिंगड फेशियल शकतो आणि आपला चेहरा चमकदार करू शकतो.

1. पहिली पायरी म्हणजे स्वच्छता. यासाठी कलिंगडचा रस आणि खोबरेल तेल एकत्र करा. त्यानंतर कापसाच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.

2. यानंतर स्क्रबिंग करण्याची वेळ. आता 2 चमचे कलिंगडचा रस घ्या आणि त्यात एक चमचा तांदळाचे पीठ मिसळा आणि चेहरा स्क्रब करा.

3. आता तिसऱ्या टप्प्याच्या चेहऱ्याला मसाज करायचे आहे. यासाठी 1 चमचा कलिंगडचा रस घ्या, त्यात 1 चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा.

4. यानंतर फेसपॅक 1 चमचा कलिंगडचा रस, 2 चमचे बेसन आणि 1 चमचे दूध एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा आणि मानेपर्यंत लावा. त्यानंतर 20-25 मिनिटे सुकू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून एकदा हे फेशियल केल्यास चेहरा चमकदार होण्यास नक्की मदत होईल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com