Krishna Janmashtami 2022: आज जन्माष्टमी साजरी करताय घ्या जाणून- पुजेची, उपवासाची वेळ

आज मथुरेतही जन्माष्टमी जल्लोशात साजरी केली जात आहे.
Krishna Janmashtami 2022
Krishna Janmashtami 2022Dainik Gomantak

श्रीकृष्ण जन्माष्टमी आजही 19 ऑगस्ट रोजी देशाच्या (Janmashtami 19 August 2022) अनेक भागामध्ये साजरी केली जात आहे, त्याचप्रमाणे आज मथुरेतही जन्माष्टमी जल्लोशात साजरी केली जात आहे. 18 ऑगस्ट रोजी देशाच्या बहुतांश भागात जन्माष्टमीही साजरी करण्यात आली आहे. (Krishna Janmashtami 2022 If you are celebrating Janmashtami today know the timing of puja fasting)

Summary

तसेच आज उदयतिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगाने जन्माष्टमी साजरी केली जात आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला, त्यामुळे दरवर्षी अष्टमीला रोहिणी नक्षत्रात जन्माष्टमी साजरी करणे शुभ मानले जाते.

Krishna Janmashtami 2022
Recipe: उरलेल्या भातापासून स्वादिष्ट अन् मसालेदार बनवा 'Chinese Fried Rice'

जन्माष्टमी व्रत 2022

काशी विश्वनाथ ऋषिकेश पंचांग नुसार, (Janmashtami 2022 Puja Muhurat) भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी 18 ऑगस्टच्या रात्री 12:14 वाजता आहे आणि ती आज 19 ऑगस्टच्या रात्री 01.16 मिनिटांपर्यंत आहे तसेच 19 ऑगस्ट रोजी सूर्योदय पहाटे 05:34 वाजता झाला आहे, अशा स्थितीत उगवत्या तिथीनुसार आज भगवान श्री कृष्णाची जन्माष्टमी आहे.

जर आपण चंद्राच्या आधारावर जरी पाहिले तर आज रात्री 11:24 वाजता चंद्र उगवत आहे. हे अष्टमी तिथीलाही होत असते तसेच या आधारावर आज जन्माष्टमी साजरी करण्यास हरकत नाही.

रोहिणी नक्षत्र सुरू झाले

भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रामध्ये रात्री झाला. आज रोहिणी नक्षत्र पहाटे 03:24 वाजता सुरू झाले आहे, जे रविवार, 21 ऑगस्ट रोजी सकाळी 07:01 पर्यंत असणार आहे.

रोहिणी नक्षत्रातील जन्माष्टमी

आज 19 ऑगस्ट रोजी रोहिणी नक्षत्राची जन्माष्टमी आहे तर आज भादपद कृष्ण अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र दोन्ही प्राप्त होत आहेत.

जन्माष्टमी पूजा मुहूर्त 2022

आज रात्री, जन्माष्टमी पूजेची वेळ 10:30 ते मध्यरात्री पर्यंत आहे. यावेळी भजन कीर्तनाने बाल गोपाळांची जयंती देखील साजरी होणार आहे. बाल गोपाळांना झुलवून त्यांची आरती करण्यात येणार आहे तर बाल श्री कृष्णाला लोनी आणि पेढ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खीर आणि पंजिरीचाही नैवेद्य दाखवू शकता. (Janmashtami Vrat And Puja Vidhi)

Krishna Janmashtami 2022
Money Tips: 'या' 4 वस्तुंची चुकूनही करू नका देवाण-घेवाण

आज जन्माष्टमीनिमित्त सर्व श्रीकृष्ण मंदिरे सजवली जाणार आहेत तर तेथे बाल गोपाळाच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार येते. तसेच जे उपवास ठेवतात ते उद्या सकाळी सूर्योदयानंतर पारण करून उपवास पूर्ण करतील.

जन्माष्टमी 2022 पूजा मंत्र (Janmashtami 2022 Puja Mantra)

सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे।

तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुम:।।

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com