Culture of Goa: गोव्याच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया

गोव्याला 1987 मध्ये स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि प्रादेशिक भाषा म्हणून कोकणीला मान्यता मिळाली.
Culture of Goa: गोव्याच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया
Culture of Goa: गोव्याच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया Dainik Gomantak

गोवन जीवन आणि संस्कृती:

भारताच्या पश्चिमकिनाऱ्यावरील एक लहान राज्य आणि पर्यटन क्षेत्र म्हणून गोवा प्रसिद्ध आहे. गोवन लोकांची सभ्यता, गोव्यात ख्रिश्चन, कॅथोलिक, मुस्लिम आणि हिंदू यासारख्या विविध धर्माचे मिश्रित लोक एकत्र राहतात. त्यांच्या जुन्या परंपरा आणि चालीरीतीचे पालन करून, गोव्याचे लोक समाजात कोणतेही धार्मिक अडथळे न आणता सर्व प्रमुख सण उत्साहाने साजरे करतात.

Dainik Gomantak

गोव्याची खाद्यसंस्कृती

गोव्यातील लोकांचे प्रमुख अन्न म्हणजे तांदुळ, मासे आणि नारळ जे इथे मुबलक प्रमाणात पिकवळल्या जाते. येथील लोकांचा मांसाहारवर जास्त जोर आहे. त्यामध्ये मत्स्याहार तर रोजचा आसतो. इसवण (सुरमई), सुंगटां, मोरी, तारले, पापलेट, कुर्ली, तिसरे, खुबे अश्या अनेक माश्यांचे तरर्‍हेर्‍हेचे पदार्थ इथं रोजच्या जेवणामध्ये बनवले जातात. माश्यांपासून आमटी किंवा फिशफ्राय बनवला जातोच पण या व्यतिरिक्त माश्यांचे लोणचे व सलाडही इथे बनते. गोव्यातील हिंदु लोक धार्मिक सणावाराला मांसाहार करत नाहीत.sthaanikl

Dainik Gomantak

स्थानिक काय म्हणतात:

गोव्यातील स्थानिक एक सुंदर आणि आरामदायी जीवन जगतात. प्रत्येक क्षण आनंदाने जगतात. येथील लोकांचा सामान्य व्यवसाय म्हणजे मासेमारी. येथील सुपीक जमीन आणि मुबलक पाणीपुरवठ्यामुळे स्थानिक लोक काजू, नारळ, फणस आणि भात यारसखे पीक घेतात. याशिवाय पर्यटनासाठी गोवा प्रसिद्ध असल्याने पर्यटन संदर्भातील अनेक व्यवसाय येथे चालतात.

Dainik Gomantak

गोव्यातील हस्तकला:

गोव्यातील लोकांना पर्यटन क्षेत्रातून आर्थिक हातभार मिळतो. तसेच लहान हस्तकला आणि दागिने या स्थानिक बाजारपेठामध्ये आढळनाऱ्या लोकप्रिय वस्तु आहेत. समुद्रकिनारी सापडलेले शंख, शिपल्यानपासून दागिने बनविले जातात. याशिवाय बांबू , पितळ आणि चांदीची दागिने आणि कलाकृतीच्या वस्तु मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते आणि जगभरतील पर्यटकांना आकर्षित करतात.

Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com