जाणून घ्या "जठर परिवर्तन" व्यायामाचे फायदे -

दैनिक गोमंतक
मंगळवार, 27 एप्रिल 2021

जठर परिवर्तन नावाप्रमाणेच पोटाचे, तसेच शरीराचे अनेक आजारांना दूर ठेवतो आणि सुडोल बांधा मिळतो.

वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय आपण करत असतो. पण तुम्हाला महिती आहे का जठर परिवर्तन व्यायाम केल्याने शरिरावरची चरबी कमी करू शकतो.वजन वाढल्याने अनेक समस्या होण्याची शक्यता अधिक असते. वजनवाढीमूळे मधुमेह, पीसीओडी, वाढलेले कोलेस्ट्रॉल, वाढलेला रक्तदाब  हे आजार उद्दाभवु शकतात. त्यांच्यासाठी हा व्यायाम खूप फायदेशीर आहे. जठर परिवर्तन नावाप्रमाणेच पोटाचे, तसेच शरीराचे अनेक आजारांना दूर ठेवतो आणि सुडोल बांधा मिळतो. (Learn the benefits of gastrointestinal exercise)

मासिक पाळी दरम्यान लस घ्यावी की नाही ?

कृती-

पाठीवर सरळ झोपून कमरेखाली एक लोड आडवा घेणे. दोन्ही हातानी लोड व्यवस्थित पकडून ठेवणे. जठर परिवर्तन व्यायाम करताना मानेवर, खांद्यावर किवा कमरेवर
जास्त ताण येऊ नये म्हणून कमरेखाली दिल जातो. सरळ झोपून दोन्ही पाय 90 अशांत वर करणे. दोन्ही पाय जोडून गोलाकार फिरवणे. हळूहळू एकेक वेढा बनवत वर्तुळ तयार करणे. पाच वेळ सरल आणि उलट दिशेने वर्तुळापासून हळूहळू 90 अंशामध्ये पाय सरळ  करणे.

जठर परिवर्तन व्यायाम करताना दोन्ही पाय घुडघ्यावर फोल्ड करून पवनमुक्तासणाची स्थिति करणे. पाच सरळ आणि उलट दिशेने ही क्रिया करणे.  

सर्वप्रथम झोपून दोन्ही पाय 90 अंशामध्ये सरळ करणे. दोन्ही पाय एकमेकांपासून थोड्या अंतरावर घेऊन दूर करणे. हळूहळू जमिनीच्या दिशेने खाली आणणे. दोन्ही पाय 
गुडघ्यात न वाकवता एकमेकाना जोडणे. नंतर  90 अंशात पाय वर उचलून घेणे. अशी सरळ आणि उलट क्रिया पांच वेळ करणे. 

जर हे सर्व प्रकरण तुम्ही पहिल्यांदाच करत असला तर पाच सरळ आणि पाच उलट अशी सुरुवात करावी. हळूहळू 10 ते 15 वेळेस सरळ आणि उलट ही क्रिया करावी. 
नियमित सराव केल्याने या व्यायामाची तीन आवर्तने करावीत. अनेक महिलांचे डिलिव्हरी नंतर पोट सुटते. अशा वेळेस जठर परिवर्तन व्यायामाने पोटाच्या स्नायूंचा टोन  वाढण्यास मदत करते. 

संबंधित बातम्या