पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करणे जाते अवघड; जाणून घ्या कसे

पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करणे जाते अवघड;  जाणून घ्या कसे
weight.

वजन कमी करणे ही काही सोपी गोष्टी नाहीये अनेक महिने व्यायाम करून, जिममध्ये तासंतास वेळ खर्च करून कुठेतरी थोडासा फरक जाणवतो. व्यायामाबरोबरच चांगलं खाणं देखील महत्त्वाचे आहे. 

पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त वेगाने वजन कमी करतात त्याच कारण अस आहे की पुरुष व्यायाम जास्त करतात. जरी एखादी स्त्री पुरुषा एवढा व्यायाम करत असली तरी, वैज्ञानिकदृष्ट्या पुरुष व स्त्रियांमध्ये जीन्स आणि बायोलॉजिकल अंतर असते. त्यामुळे स्त्रियांना साईड फॅट कमी करायला अवघड जाते.(Learn how it is difficult for women to lose weight than men)

स्नायू 

पुरुषांचे स्नायू हे स्त्रियांपेक्षा पातळ असतात. स्रियांचे स्नायू हे मेदयुक्त असतात, त्यामुळे पुरुषांच्या शरीरातील कॅलरीज पटकन बर्न होतात. जरी पुरुष आणि महिलांनी सारखा आहार घेतला तरी स्नायूच्या रचनेमुळे पुरुष महिलांपेक्षा लवकर वजन कमी करतात.

संप्रेरके (Hormones)

स्त्री आणि पुरुषांमध्ये वेगवेगळे संप्रेरके असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. महिलांमध्ये जास्त इस्ट्रोजेन जास्त प्रमाणात असते तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन जास्त असते. यामुळे स्त्रीयांना वजन कमी करायला वेळ लागतो. याशिवाय घ्रेलिन नावाच्या संप्रेरकामुळे स्रियांना कॅलरी बर्न करतानासुद्धा त्रास होतो.टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन ही संप्रेरके पुरुष आणि स्रिया दोघांच्याही शरीरात आढळतात. त्यामुळे पुरुषांचे स्तन  वाढणे किंवा महिलांच्या चेहेऱ्यावर केस येणं हे प्रकार घडू शकतात.

शरीरातील फॅट 

स्त्रियांच्या शरीरातील फॅट्स पुरुषांच्या तुलनेत 6 टक्के  ते 11 टक्के  जास्त असतात. त्याचा उपयोग महिलांना गर्भधारणेदरम्यान होतो. लहानपणापासून ते महिला होईपर्यंत स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा फॅट्स जास्त असतात.

वजन कमी कसे कराल? 

रोज वेगळा व्यायाम करा: रोज एकच व्यायाम नका करू त्याने वजन कमी करण्यास वेळ लागतो. एक दिवस नुसत पळा, एक दिवस अप्पर बॉडी घ्या एक दिवस लोवेर बॉडी घ्या त्याने वजन लवकर कमी होईल.

लो कॅलरी डाएट: शरीरात कॅलरीचे प्रमाण जास्त झाले तर त्याचे रूपांतर हे फॅटमध्ये होते, त्यामुळे शरीरात कॅलरी कमी गेल्या तर फॅट वाढणार नाही आणि आपोआप वजन कमी होईल.

रोजचं शेड्युल बदला: फक्त व्यायाम आणि आहारा चांगला घेतल्यामुळे वजन कमी होत नाही. त्यासोबत चांगली झोप घेणं, बाहेरचं न खाणं, मसालेदार न खाणं या गोष्टी पाळल्या तरी वजन कमी होण्यास मदत होईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com