Ganesh Chaturthi Special Recipe: तांदळाची उकड

ही उकड खायला देताना वर भरपूर खोबरं, कोथिंबीर आणि साजूक तूप घालून गरम द्यावी.
Ganesh Chaturthi Special Recipe: तांदळाची उकड
तांदळाची उकळ Dainik Gomantak

देशात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पांच्या मोठ्या भक्ती भावात घरी आणण्यासाठी सर्व जण आतूर झाले असून, बाप्पांच्या सजावटी, प्रसादाचे पदार्थ याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. या 10 दिवसांत बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. चला तर मग जाणून घेवूया तांदळाची उकळ कशी बनवतात.

साहित्य

एक वाटी तांदळाची पिठी, दोन वाट्या ताक, फोडणीचे साहित्य, तूप, दोन चमचे शेंगदाणे, दोन चमचे डाळं, कोथिंबीर, ओले खोबरे, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा किसलेलं आलं.

तांदळाची उकळ
Ganesh Chaturthi 2021: आई...देव बाप्‍पा आले!

कृती

प्रथम तूप गरम करून हिंग-जिऱ्याची फोडणी करावी. हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचा कीस घालून थोडं परतावं व मग हळद घालावी. शेंगदाणे आणि डाळं या फोडणीत परतून घ्यावं. मग ताक घालून उकळी आणावी. त्यात तांदळाची पिठी हळूहळू घालावी. उलथन्याच्या टोकाने हलवावी. गुठळी होऊ देऊ नये. झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. पुन्हा एकदा हलवून घ्यावे व आणखी एक वाफ आणावी. उकड थोडी चकचकीत दिसू लागली आणि खमंग वास आला, की चांगली शिजली असे समजावे. ही उकड खायला देताना वर भरपूर खोबरं, कोथिंबीर आणि साजूक तूप घालून गरम द्यावी.

मानसी काणे

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com