डॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला घेताना बोला बिनधास्त

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जून 2021

जेव्हापासून कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढला आहे तेव्हापासून बहुतेक लोक डॉक्टरांकडून ऑनलाइन सल्ला घेणे अधिक प्रमाणात घेतांना दिसतात. विशेषत: लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन सेवेची मागणी वाढली आहे.

जेव्हापासून कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढला आहे तेव्हापासून बहुतेक लोक डॉक्टरांकडून ऑनलाइन सल्ला घेणे अधिक प्रमाणात घेतांना दिसतात. विशेषत: लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन सेवेची मागणी वाढली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ही पद्धत देखील योग्य आहे, कारण कोरोना कालावधीत जास्तवेळ घरात राहणेच योग्य आहे. जेणेकरून बाहेर वाढणारा संसर्ग टाळता येईल. घरीच ऑनलाइन सल्ला घेतल्याने रुग्णाला किंवा डॉक्टरांनाही घराबाहेर जायची आवश्यकता नाही. विशेषतः वृद्धांनाही याचा जास्त फायदा होतो. अशा परिस्थितीत, आणि आता तुम्हाला देखील घराबाहेर पडायचे नसेल आणि डॉक्टरांकडून ऑनलाइन सल्ला घेण्याचा विचार करत असाल तर आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपण कमी वेळात अधिक चांगल्या प्रकारे डॉक्टरांकजून आजाराबद्दल कसा सल्ला घेऊ शकाल.(Learn these special things when consulting an online doctor)

रजिस्टर्ड डॉक्टरांचा सल्ला घ्या
कोरोना साथीच्या या भयानक काळात सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, आपण घराबाहेर कमी गेलात तर चांगले आहे. म्हणूनच कोरोना संक्रमणाच्या काळात ऑनलाइन डॉक्टरांच्या सेवेची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत आपण त्याचा अधीक फायदा देखील घेऊ शकता. परंतु ज्या डॉक्टरांचे नाव शासकीय नोंदणीकृत यादीमध्ये आहे त्याच डॉक्टरांचा सल्ला घ्या. किंवा एखादा डॉक्टर ज्याला आपण व्यक्तिशः आधीच ओळखतो त्याचा सल्ला घ्या.

तंदुरूस्तीसाठी केळी खात असाल तर आधी हे तोटे जाणून घ्या

डॉक्टरांविषयी जरूर जाणून घ्या
आपण डॉक्टरांची निवड करत असतांना मान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत वेबसाइट्स शोधून त्या डॉक्टरांबद्दल आवश्यक माहित घेणे गरजेचं आहे , सर्व प्रथम, डॉक्टरांचे नाव आणि त्यांच्या पूर्ण पात्रतेबद्दल माहिती मिळवा. मग डॉक्टरांशी संपर्क साधा. 

व्हिडिओ किंवा फोन कॉल करा
ऑनलाईन सल्ले घेण्यासाठी व्हिडीओ कॉल्स चा वापर करा. यासाठी स्वत: ला तयार करा जेणेकरून आपण बोलताना घाबरू शकणार नाही आणि डॉक्टरांना आपला मुद्दा स्पष्टपणे सांगू शकाल. जर आपणास व्हिडिओ कॉलसाठी चांगले वाटत नसेल तर आपण फोन कॉलद्वारे देखील सल्ला घेऊ शकता.

आधीपासून घेत असलेल्या ओषधांची माहिती द्या
आधीपासूनच औषध घेत असाल तर प्रथम आपल्या औषधाची माहिती द्या, ते ओषध आणि त्याची प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांना दाखवा. असे केल्याने आपल्याला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. आपल्याला नेमका कोणते ओषध आणि कसा उपचार करण्यात आला हे डॉक्टरांना समजणे सोपे होईल.

ब्रेन ट्यूमर झालाय... घाबरु नका जागरुक व्हा!

औषधाचे प्रिस्क्रिप्शन जरूर घ्या
ऑनलाइन सल्ला घेताना, निश्चितपणे आपल्या डॉक्टरांनी दिलेले औषध लिहून घ्या. ज्यामुळे आपण  हे प्रिस्क्रिप्शन स्कॅन करुन सोशल साइट किंवा मेलद्वारे ऑर्डर करून मिळवू शकता. त्याच वेळी, आपल्या आजाराच्या संबंधात अजिबात संकोच करू नका, आणि आपल्या अवस्थेबद्दल आपल्या डॉक्टरांना उघडपणे सांगा.

संबंधित बातम्या