dragon fruit
dragon fruit

जाणून घ्या ड्रॅगन फळाचे जबरदस्त फायदे

Health Care  Tips -  दक्षिण अमेरिकेत  ड्रॅगन (Dragon Fruit) या नावाचे फळ आढळते. हे द्राक्षवेलीप्रमाणे एक फळ आहे. ड्रॅगन फळाचे स्टेम्स मांसल आणि रसाळ असतात. या फळाचे दोन प्रकार असते. एका प्रकारच्या फळात पांढरा आणि दुसऱ्या प्रकारच्या फळामध्ये लाल रंगाचा रसाळ भाग असतो. ड्रॅगन फळ (Dragon Fruit) औषध म्हणून देखील वापरले जाते. हे आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर आहे. ड्रॅगन फळामध्ये अनेक पोषक तत्त्वे असतात. त्यात फायबर, अँटीऑक्सिडेंट्स, खनिज आणि जीवनसत्त्वे (Vitamins) यासारखे पोषक असतात. जाणून घेऊया याचे महत्व (Learn the tremendous benefits of dragon fruit)

- ड्रॅगन फळ हे शरीरावरील सूज कमी करण्यास उपयुक्त आहे. या फळामध्ये दाहकविरोधी गुणधर्म  असते.  हे स्नायूंच्या वेदणेपासून मुक्ती मिळण्यास मदत करते. 
संधिवात असलेल्यांनी या फळाचे आहारात सेवन करावे. 

- ड्रॅगन फळ  खाल्याने त्वचेवर चमक येते. तसेच त्वचा  निरोगी राहण्यास मदत करते. ड्रॅगन फळामध्ये व्हिटॅमिन सी आहे, जे त्वचेच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे. ड्रॅगन फळाचे सेवन केल्यास मुरुम कमी होते. कोरड्या त्वचेवर उपचार म्हणून देखील तुम्ही ड्रॅगन फळाचे सेवन करू शकता. तसेच पचनव्यवस्था सुधारण़्यासाठी ड्रॅगन फळामध्ये फायबर जास्त असते. या फलामुळे बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी इतर समस्या दूर ठेवण्यास मदत करते.

 - या फलामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. ड्रॅगन फळ लोकप्रिय होण्याचे हे सर्वात मोठे कारण  आहे. ड्रॅगन फळ खाल्ल्यास हार्टअटॅकचा झटका तसेच ह्रदयाशी संबंधीत इतर आजरांचा धोका कमी होतो. या फळाच्या बिया आपल्या शरीराला आवश्यक ओमेगा -3 आणि ओमेगा -6 फॅटी अ‍ॅसिड प्रदान करतात, जे हृदयाच्या 
आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

- हे फळ खाल्याने वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करायचे असेल तर  या फळाचा आहारात समावेश नक्की करा. चरबी कमी होण्यास आणि शरीरातील कॅलरी कमी करण्यास मदत करते. या फळाने पोत देखील भरते. यामुळे आपण बराच वेळ जेवण न करता राहू शकतो. यामुळेच आपले वजन कमी होण्यास मदत मिळते. 

या फळाचे विविध प्रकारे सेवन करता येऊ शकते. ड्रॅगन फ्रूट स्मूदी देखील तयार करून तुम्ही सेवन करू शकता. यासाठी  1 ड्रॅगन फळ, पुदीनाची पाने आणि 1 कप दही घ्यावे. ड्रॅगन फळाचे लहान तुकडे करून घ्यावे. पुदीनाची पाने बारीक करून घ्यावी. नंतर मिक्सरमध्ये दही घाला. याचे मिश्रण ग्लासामध्ये घेऊन बर्फ आणि  ताज्या पुदीनाच्या पानांसोबत सेवन करावे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com