जाणून घ्या काय आहे IVF फर्टिलिटी ट्रीटमेंट

जर तुम्ही IVF उपचाराची योजना आखत असाल, तर तुम्हाला IVF ट्रीटमेंट ची ही माहिती असणे आवश्यक आहे.
जाणून घ्या काय आहे IVF फर्टिलिटी ट्रीटमेंट
IVF fertility treatmentDainik Gomantak

जर तुम्ही IVF उपचाराची योजना आखत असाल, तर तुम्हाला IVF ट्रीटमेंट ची ही माहिती असणे आवश्यक आहे. इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) हा पुनरुत्पादक तंत्रज्ञानाच्या (एआरटी) सर्वात प्रभावी प्रकारांपैकी एक आहे. ज्याने वंध्यत्वाशी लढणाऱ्या असंख्य जोडप्यांना मदत केली आहे. जेव्हा तुमचा आयव्हीएफ प्रवास सुरू कराल, तेव्हा तुम्हाला पुढचा रस्ता खूपच अनिश्चित वाटेल यासाठी तुमची एकनिष्टता खूप महत्वाची असते; तसं बघायला गेलं तर प्रत्येक जोडप्याचा अनुभव वेगळा वेगळा असू शकतो म्हणूनच तुमचे आयव्हीएफ सायकल नेमके कसे असेल याचा अंदाज बांधणे अशक्य आहे.

IVF fertility treatment
का होतो प्रेशर कुकरचा स्फोट; जणून घ्या करणे
Learn what is IVF fertility treatment
Learn what is IVF fertility treatmentDainik Gomantak

संपूर्ण आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय अनुभव येईल हे समजून घेण्यासाठी; आयव्हीएफ प्रत्यक्षात काय आहे आणि ते कसे कार्य करते यावर चांगला अभ्यास करणे महत्वाचे आहे. तज्ञ फर्टिलिटी कन्सल्टंट डॉक्टरनी दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी आयव्हीएफ प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

IVF प्रक्रियेचे पाच टप्पे

अंडाशयांमध्ये उत्तेजन (Ovarian stimulation)

आपल्या अंडाशयांमध्ये अधिक अंडी वाढण्यास उत्तेजन देण्यासाठी आपल्याला प्रजनन शक्ति वाढवण्यासाठी औषधे (इंजेक्शन) दिली जातात. या कालावधी दरम्यान, आपल्याला आपल्या अंडाशय आणि आपल्या एंडोमेट्रियमची तपासणी करण्यासाठी नियमित ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंडसाठी पाठपुरावा करावा लागतो.

अंडी पुनर्प्राप्ती (Egg retrieval)

एकदा तुमचे अंडाशयांमध्ये एग तयार झाल्यावर, तुम्हाला अंड्यांच्या अंतिम परिपक्वतासाठी इंजेक्शन (ट्रिगर शॉट) दिले जातील आणि त्यानंतर 34 ते 36 तासांनी Oocyte Pick Up (OPU) नावाच्या किरकोळ शस्त्रक्रिया प्रक्रियेद्वारे तुमची अंडी परत मिळतील. ही सर्व प्रक्रिया OPU नेस्थेसिया अंतर्गत आणि अल्ट्रासाऊंड मार्गदर्शनाच्या मदतीने केले जाते.

शुक्राणूंचा नमुना (Sperm sample)

ज्या दिवशी सकाळी तुमची अंडी परत मिळतील, त्या शुक्राणूंचा नमुना घेतला जातो. काही केस मध्ये स्पम डोनर ची मदत घ्यावी लागते.

फर्टिलायझेशन आणि भ्रूण संस्कृती (Fertilization and embryo culture)

आता, आयव्हीएफ प्रयोगशाळेत, तुमच्या अंड्यांना शुक्राणूंनी फलित केले जाते आणि परिणामी भ्रूण एक भ्रूण फलित होते; त्यांच्या वाढीस अंदाजे 3 ते 6 दिवस लागतात.

IVF fertility treatment
वजन कमी करण्यासाठी हे पाच सर्वोत्तम उपाय करा फॉलो
IVF fertility treatment
IVF fertility treatmentDainik Gomantak

भ्रूण हस्तांतरण (Embryo transfer)

ज्या दिवशी तुमची अंडी पुनर्प्राप्त केली जातील; त्या दिवशी तुम्हाला तुमच्या गर्भाशयाचे अस्तर तयार करण्यासाठी काही औषधे सुरू करण्याचा सल्ला दिला जातो; गर्भाधानानंतर सुमारे तीन ते पाच दिवसांनी, तुमचे डॉक्टर कॅथेटर वापरून तुमच्या गर्भाशयात एक किंवा दोन भ्रूण ठेवतील. या भ्रूण हस्तांतरण प्रक्रियेस कोणतीही भूल देण्याची आवश्यकता नसते.

सगळ्याच स्त्रियांना अंडं मिळवलेल्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होईल असे नाही; काही वेळा भ्रूण हस्तांतरण होत नाही. काही परिस्थितींमध्ये, सर्व भ्रूण फ्रोजन ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि नंतर एक किंवा दोन महिन्यांनंतर हा भ्रूण हस्तांतरणाची योजना केली जाते.

अर्थातच पुढची पायरी म्हणजे गर्भधारणा चाचणी जी दोन आठवड्यांनी केली जाते! या दोन आठवड्यांच्या दरम्यान तुमच्या गर्भधारणा चाचणीपर्यंत प्रतीक्षा करा, दरम्यान तुम्हाला बेड विश्रांतीची अजिबात गरज नाही. दरम्यान तुम्ही तुमच्या सर्व औषधे योग्य वेळेत घेणे आवश्यक आहे. डॉक्टरनी दिलेल्या सुचनांचे नियमित पालन करत रहा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com