प्रेमाचं सौंदर्य राखूया !

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

माणसाच्या जीवनात प्रेम हे एकप्रकारची जुनाट जवळीक किंवा सोयरीक होऊन राहिलं आहे आणि हे प्रेम अर्थातच ईश्‍वरीयच आहे. Love lives life. याचा अर्थ प्रेमच जीवन जगत असतं. प्रेम ही हृदयाची भाषा जाणतं, त्यामुळंच ते न बोलता बोलतं, नजरेनं स्पर्श करतं, मनाचे बोल ऐकतं आणि हातांचा वापर न करता ''ये हृदयीचं ते हृदयी ओततं!'' असं हे चंद्र-बुध-शुक्राचं त्रिकूट प्रेमाचा आनंद साजरा करत असतं. 

 बुध आणि शुक्र ही जोडगोळी मधूनमधून सूर्याच्या जवळ जाते आणि मग मूड आला, की ही जोडी पृथ्वीच्या अगदी प्रेमात येते, तिच्यासुद्धा जवळ येत असते. असा हा या जोडीच्या प्रेमाचा खेळ मोठा मजेदारपणे चालत असतो. अतिशय जवळीकतेचं नातं जपणारी ही जोडगोळी पृथ्वीच्या चंद्राला खेळात ओढत माणसाच्या जीवनातलं भावसौंदर्य वाढवत असते. माणसाच्या मनाचे सर्व प्रकारचे मूड चंद्र तर जपत असतोच; परंतु या मूडला ही बुध-शुक्राची जोडगोळी लडिवाळ असं रूप देत म्हणजे हसणं-मुरकणं देत असते. जीवनात मुसमुसणारं सौंदर्य आणणारी हीच ती बुध-शुक्राची जोडगोळी! फलज्योतिषात चंद्र-शुक्र-बुध हे त्रिकूट नसतं, तर जीवन हे गाणं न होता एक कायमचं रडगाणं झालं असतं. 

माणसाच्या जीवनात प्रेम हे एकप्रकारची जुनाट जवळीक किंवा सोयरीक होऊन राहिलं आहे आणि हे प्रेम अर्थातच ईश्‍वरीयच आहे. Love lives life. याचा अर्थ प्रेमच जीवन जगत असतं. प्रेम ही हृदयाची भाषा जाणतं, त्यामुळंच ते न बोलता बोलतं, नजरेनं स्पर्श करतं, मनाचे बोल ऐकतं आणि हातांचा वापर न करता ''ये हृदयीचं ते हृदयी ओततं!'' असं हे चंद्र-बुध-शुक्राचं त्रिकूट प्रेमाचा आनंद साजरा करत असतं. 

माणसाचं मनच आत्मज्योती होत असतं. कारण चित्तशुद्धी झाल्यावर निर्मल मनरूपात असणारी निर्मलता म्हणजेच प्रेमाचं पारदर्शी स्वरूप असलेलं स्फटिक लिंग होय. माणसाचं मन ओळखणारं ज्योतिष चंद्रकलांचा अभ्यास किंवा ध्यास घेतं. या चंद्रकलांना जाणणारी बुद्धी ही बुधाची आहे आणि या बुद्धीचं वैभव जपणाऱ्या चंद्र-शुक्राच्या कलाच होत आणि या चंद्र-शुक्राच्या कलाच शिव-पार्वतीच्या प्रपंचाचं वैभव किंवा सौभाग्य वाढवत असतात. 

सप्ताहात ४-११-२०२० रोजी करकचतुर्थी आहे. ही एक चंद्रकलाच आहे. या चंद्रकलेचं दर्शन घेऊन प्रेमिक नववधू आपल्या जीवनातील सौभाग्य वाढवत असतात. इंद्राची स्वामिनी शचीदेखील व्रतस्थ होऊन या चंद्रकलेचं दर्शन घेत असे. मित्रहो, यंदाची ही करकचतुर्थीची चंद्रकला बुध-शुक्राच्या अन्योन्ययोगाच्या पार्श्‍वभूमीवर उगवेल. या चंद्रकलेचं दर्शन घेऊन आपण आपल्या जीवनातील प्रेमाचं सौंदर्य किंवा सौभाग्य अबाधित ठेवूया! 

संबंधित बातम्या