चला वळूया आपल्या आयुर्वेदाकडे; तुम्हाला अश्वगंधेचे हे गुणकारी उपाय माहिती आहेत का ?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

श्वगंधा ही  एक औषधी वनस्पती आहे ज्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्म असतात. 

श्वगंधा ही  एक औषधी वनस्पती आहे ज्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्म आहेत. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.यासह, लठ्ठपणामुळे पीडित लोकांसाठी देखील अश्वगंधा फायदेशीर आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी जणू वरदानच आहे.

अश्वगंधा म्हणजे काय ?

हे एक लहान सदाहरित झुडूप आहे जे मुख्यतः भारत आणि आफ्रिकेत वाढते. अश्वगंधा बहुधा ताण आणि इतर अनेक वैद्यकीय अनियमितता जसे, निद्रानाश, संधिवात, उदासीनता दूर करण्यासाठीच्या आयुर्वेदीक उपचारांसाठी वापरली जाते. यात बरेच औषधी गुणधर्म आहेत जे शरीरातून अतिरिक्त चरबी काढून टाकण्यास मदत करते. अश्वगंधा वनस्पती हा अँटिऑक्सिडंट्सचा खजिना आहे.  ताण कमी करण्यात मदत होते.  चयापचय वाढवून शरीरात जमा होणारी अतिरिकित चरबी वितळण्यास हे उपयुक्त आहे. 
 

रक्तदाब नियंत्रित ठेवते

अश्वगंधा केवळ वजनच कमी करण्यातच नाही तर रक्तदाब योग्य ठेवणे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढवणे यासाठीदेखील उपयुक्त आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढवते

रोगप्रतिकारक शक्ती शरीराचे संरक्षण करण्यास तसेच रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते. अश्वगंधा रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

ताणतणाव व्यवस्थापन

जास्त ताणतणावामुळे वजन वाढणे आणि आरोग्याच्या इतर अनेक समस्या उद्भवू शकतात, यामुळे गंभीर व्याधी होण्याची समस्यादेखील बळावते. त्यामुळे ताण कमी करून गंभीर व्यादींपासून दूर राहण्यसाठी याचे सेवन जरूर करावे.

शांत झोप लागते

आपल्याला योग्य झोप येत नसेल तरीही वजन वाढू शकते आणि आपण दिवसभर थकल्यासारखे

संबंधित बातम्या