बियॉण्ड द क्लास विंडो

तिला योगायोगाने नंतर समजते की जीवन वर्गापुरते सिमित नसून ते वर्गाबाहेरच घडत असते.
classroom
classroomDainik Gomantak

लेखिका स्मिता भंडारे कामत, आपल्या ‘बिय​ॉण्ड द क्लास विंडो’ या पुस्तकातून तिचा वैयक्तिक जीवन प्रवास, तिच्या आयुष्यातील घटना आणि योगायोग यांचे दस्तऐवजीकरण करण्याचा प्रयत्न करते. जीवनातील अतर्क्य मार्ग समजण्याचा प्रयत्न करणारी एक निरागस लहान मुलगी ते जगाचा वेध घेण्यास उत्सुक असलेली एक अधीर तरुण मुलगी या भूमिकेतून ती कथन करण्यास सुरुवात करते. तिला योगायोगाने नंतर समजते की जीवन वर्गापुरते सिमित नसून ते वर्गाबाहेरच घडत असते.

classroom
लॉकडाऊनच्या काळात मुक्या जिवांसाठी 'या' झाल्या अन्नपुर्णा

पण याहून अधिक निर्दय कर्म काय असेल जे तिला, त्याच वर्गात, टेबलाच्या विरुद्ध बाजूला उभे करून अद्यापन करण्यास भाग पाडते. तिच्या शैक्षणिक अनुभवांव्यतिरिक्त, एक कौटुंबिक आणि सामाजिक सदस्या या नात्याने तिची उत्कट निरीक्षणे तिने या लेखसंग्रहातून मांडली आहेत. विविध विषयांचा समावेश असलेले 56 स्वतंत्र लेख पुस्तकातील 237 पानांतून मांडले गेले आहेत. वचनबद्धता, मोह, प्रेम, विश्वासघात, धमकी, LGBT समस्या, अध्यात्मवाद अशा अनेक विषयांना हे पुस्तक स्पर्श करते. शिवाय लेखीका स्वत:च व्यंगचित्रकार असल्याने या कथनाला तिच्या योग्य रेखाचित्रांचीही साथ लाभली आहे. ‘बिय​ॉण्ड द क्लास विंडो’ हे पुस्तक स्थानिक दैनिके आणि मासिकांमधून प्रसिद्ध झालेल्या तिच्या लेखांचे निवडक संकलन आहे.

लेखिकेबद्दल

डॉ. स्मिता भंडारे कामत या राज्य पुरस्कारप्राप्त (गोवा सरकार), संशोधिका आहेत. ‘एस. एस. धेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स'मध्ये वाणिज्य विभागात त्या सहयोगी प्राध्यापक आहेत. स्मिता दोन दशकांहून अधिक काळ, साहित्यिक या नात्याने पत्रकारितेशी संबंधित राहिल्या आहेत. त्यानी चार सर्जनशील पुस्तकेही लिहिली आहेत. ‘विथ अ पिंच ऑफ सॉल्ट’ (2017) हे सामाजिक-राजकीय व्यंगचित्रांवरील पुस्तक, ‘सोल ड्रॉप्स’ (2009) हा इंग्रजी कवितांचा संग्रह, आणि ‘पोरसांताली फुला’ (2007) आणि ‘फुलता ती फुलां’ (2007) हे कोकणी भाषिक युवकांसाठी केलेले लघुकथांचे संकलन अशी तिची पुस्तके आहेत. ‘ले क्रॅयोन’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टुनिंग’, बिर्कितपबिंदोस्त कॅरिकत्युर’ (टर्की) इत्यादी आंतरराष्ट्रीय व्यंग्यचित्रमंचाशी संबंधित असल्यामुळे तिला या पुस्तकाला रेखाचित्रे जोडून, त्याला दृश्यात्मक परिणाम प्रदान करणे शक्य झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com