Bakarwadi: घरीच बनवा चविष्ट बाकरवडी!

Bakarwadi: पिठाचे गोळे बनवून ते चौकोनाकृती लाटून घ्यावेत.
Bhakarwadi
BhakarwadiDainik Gomantak

Bakarwadi: आपण नेहमीच वेगवेगळे पदार्थ चाखत असतो. पदार्थाच्या जुन्या पद्धतीत बदल करुन नवीन काहीतरी बनवत असतो. अनेक गृहीणी आपल्या स्वयंपाकघरात सतत काहीतरी प्रयोग करत असतात. आपण बाहेर फिरायला गेल्यावर आपल्याला छान कुरकुरीत पदार्थ आपल्याला आकर्षित करत असतात. चला तर जाणून घेऊयात आज असाच एक पदार्थ बाकरवडी. जो तुम्ही घरच्याघरी बनवू शकता.

ओलं खोबरं एक वाटी, बडीशेप एक टेबलस्पून, एक टेबलस्पून धने, चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या, ओले मटार दीड वाटी कोथिंबीर दोन ते तीन चमचे, एक लहान आल्याचा तुकडा, एका लिंबाची फोड , मीठ याबरोबरच दोन वाट्या मैदा,पाव वाटी तेलाचे मोहन, पाव वाटी तेलाचे मोहन, एक चमचा ओवा, तळण्यासाठी तेल हे साहित्य बाकरवडी करण्यासाठी लागेल.

Bhakarwadi
Smartphone Camera: तुम्हाला माहितीये का आपल्या फोनला 3 कॅमेरे का असतात? नसेल तर इथे नक्की वाचा

मैद्यामध्ये ओवा आणि मीठ घालून मिक्स करावे. त्यातच पाव वाटी तेलाचे मोहन घालून थंड पाण्यानं हे पीठ थोडंसं घट्ट भिजवून घ्यावं आणि पंधरा-वीस मिनिटं बाजूला ठेवून द्यावे. सारण करताना प्रथम एक चमचा तेलावर मटार परतून घ्यावेत. मिक्सरवर हे परतलेले मटार खोवलेला नारळ, हिरव्या मिरच्या आलं, बडीशेप आणि धने वाटून घ्यावेत.

आपल्याला याची पेस्ट करण्यापेक्षा हे मिश्रण भरड असेल तुमच्या बाकरवडीला चव येईल. यात चवीनुसार मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यावा. चिरलेली ताजी कोथिंबीर घालावी आणि तुम्हाला गोड चव हवी असल्यास यात तुम्ही अर्धा चमचा साखर घालू शकता.

पिठाचे गोळे बनवून ते चौकोनाकृती लाटून घ्यावेत. त्यावर मटार आणि नारळाचं सारण पसरवून त्याचा घट्ट रोल बनवावा. एका धारदार सुरीच्या मदतीनं काप करून तळून घ्यावेत. अशा पद्धीतीने चविष्ट बाकरवड्या तयार होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com