आपल्या लाडक्या बाप्पांसाठी बनवा स्वादिष्ट गुजराती बासुंदी

गुजराती बासुंदी स्वादिष्ट असून बनवायला अगदी सोपी आहे.
आपल्या लाडक्या बाप्पांसाठी बनवा स्वादिष्ट गुजराती बासुंदी
आपल्या लाडक्या बाप्पांसाठी बनवा स्वादिष्ट गुजराती बासुंदी Dainik Gomantak

घरघरात गणेशोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचला आहे. 10 दिवसांत बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्याचा सगळ्यांचा अट्टाहास असतो. बाप्पाचे आगमन होऊन चार दिवस झाले आहेत. आतापर्यंत तुम्ही मोदक (Modak) , लाडू (Ladu) आणि हलव्याचा (Halwa) प्रसाद गणपती बाप्पांसाठी (Ganpati Bappa) बनवला असेल. तर आज काही तरी नवीन बनवून पाहूया. चला तर मग जाणून घेवूया गुजराती बासुंदी कशी बनवायची. गुजराती बासुंदी स्वादिष्ट असून बनवायला अगदी सोपी आहे.

* साहित्य

 • 1 लीटर दूध

 • 1/2 कप साखर

 • 1/2 टीस्पुन वेलची पावडर

 • 2 चमचे बदामचे तुकडे

 • 2 चमचे काजूचे बारीक तुकडे

 • 2 चमचे बदाम पावडर

 • 2 चमचे पिस्ताचे बारीक तुकडे

 • केसर

आपल्या लाडक्या बाप्पांसाठी बनवा स्वादिष्ट गुजराती बासुंदी
Ganpati Bappa ला चुकूनही वाहू नका हे फूल

* कृती

 • बासुंदी तयार करण्यासाठी एका नॉन स्टिक पॅनमध्ये किंवा एका काढाईमध्ये 3 ते 4 मिनिटे उकळावे.

 • नंतर दूध घट्ट होईपर्यंत उकळावे.

 • नंतर त्यात साखर टाकावी आणि मंद आचेवर 10 ते 12 मिनिटे शिजवावे.

 • यात नंतर वेलची पावडर आणि केसर टाकावे.

 • नंतर यात थोडा खवा मिक्स करावा.

 • नंतर थंड करण्यासाठी ठेवावे.

 • शेवटी बदाम, पिस्ता आणि केसर ने सजावट करावी.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com