निरोगी केसांसाठी कांद्यापासून बनवा 'Hair Spray'

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी कांद्यापासून बनवलेले हेयर स्प्रे उपयुक्त ठरते .
निरोगी केसांसाठी कांद्यापासून बनवा 'Hair Spray'
onion 'Hair Spray' for healthy hairDainik Gomantak

प्रत्येक महिलेला आपले केस (Hair) सुंदर असावे असे वाटते. परंतु अनेकांना सूर्यप्रकाश, प्रदूषण अशा विविध गोष्टींचा सामना करावा लागतो. यामुळे केसांचे आरोग्य (Hair Health) खराब होऊ शकते. यामुळे केसांमध्ये कोंडा, केस गळणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी अनेक लोक महागडे प्रॉडक्ट (Product) वापरतात किंवा पार्लरमध्ये जावून महागड्या उपचारांमध्ये पैसे वाया घालतात. केसांसाठी कांदा उपयुक्त आहे हे तुम्ही बरेचदा एकले असेल. पण यामुळे केसांमध्ये (Hair) येणार वास कमी करायचा असला तर तुम्ही कांद्यापासून हेयर स्प्रे तयार करून वापरू शकता. चला तर मग जाणून घेवूया कांद्यापासून तयार केलेल्या हेयर स्प्रेचे (Hair Spray) फायदे.

* कांद्याचे फायदे

कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे केस दाट होऊन केसांचे गळणे कमी होते. त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि बुरशीविरोधी गुणधर्म आहेत. यामुळे केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत मिळते. तसेच कांद्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात.

* हेयर स्प्रे कसे बनवण्याची पद्धत

कांद्यापासून हेयर स्प्रे तयार करण्यासाठी सर्वात पहिले कांदा सोलून घ्यावे. नंतर कांद्याचा रस काढावा. यासाठी एका सूती कापडामध्ये कांद्याचा खिस घेवूण हाताच्या मदतीने चांगले पिळून घ्या. नंतर त्यात लिंबू मिक्स करावे. नंतर त्यात कोरफड जेल मिक्स करा. संपूर्ण मिश्रण एकजीव केल्यासएका स्प्रे बाटलीमध्ये टाकावे.

 onion 'Hair Spray' for healthy hair
Hair Care Tips: मुलायम केसांसाठी मिनिटांमध्ये घरीच बनवा Hair Gel

* हेयर स्प्रे कसा वापरावा

ज्याप्रमाणे चेहऱ्यावर काहीही लावण्यापूर्वी फेस वॉश केले जाते, त्याचप्रमाणे आपले केस स्वच्छ करावे. हेयर स्प्रे अर्ध्या तासासाठी केसांना लावून ठेवावे नंतर शॅम्पू लावून स्वच्छ करावे. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास केस केसांचे आरोग्य चांगले राहते. तसेच केसां संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.

Related Stories

No stories found.