
वास्तुशास्त्रात (Vastushastra) स्वयंपाकघराचे (Kitchen) महत्त्वाचे स्थान सांगितले आहे. स्वयंपाकघर, घरात सुख, समृद्धी, शांती आणि आनंद (Wealth, Peace And Happiness) घेऊन येत असते. तसेच घराच्या किचनमध्ये अशा अनेक वस्तू आहेत, ज्या नेहमी किचनमध्ये असणे खूप महत्त्वाचे मानले जाते. घरावरील देव देवतांचा आशिर्वाद (Blessings) आणि आई अन्नपूर्णेचा स्वभाव या वस्तूंशी जोडलेला असतो. या वस्तू संपल्याने घरातील सुख-शांती देखील संपते, असे मानले जाते. त्यामुळे या वस्तू घरातून कधीही संपणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
पीठ (Flour)
पीठ (Flour) आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत महत्वाची वस्तू आहे. पीठाचा वापर करून आपल्याकडे अनेक पदार्थ बनवले जातात. अनेकजण घरातले संपूर्ण पीठ संपल्यानंतरच घरात दुसरे पीठ भरतात, परंतु असे करणे योग्य मानले जात नाही. घरातील पीठ संपणार आहे असे लक्षात अल्यानंतर ते संपण्यापूर्वीच पूर्ण भरून घ्यायला हवे.
तसेच, पिठाच्या डब्यावरील धूळ कधीही झटकू नये. असे मानले जाते की असे केल्याने धनाची हानी आणि व्यक्तीचा मान-सन्मानही कमी होतो.
मोहरीचे तेल (Mustard Oil)
मोहरीचे तेल देखील स्वयंपाकघरातील अशीच एक महत्वाची वस्तू आहे. मोहरीचे तेल (Mustard Oil) शनि ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते, त्यामुळे घरातून मोहरीचे तेल संपण्यापूर्वी ते पुन्हा भरावे. पीठा प्रमाणेच ते संपण्याची वाट न पाहता त्यापूर्वीच भरून ठेवणे योग्य ठरते.
मीठ (Salt)
स्वयंपाकघरातील मिठाचा डबा कधीही रिकामा नसावा, असे वास्तुशास्त्रात (vastushastra) मानले जाते. ज्योतिषशास्त्रातही (Astrology) मीठाला राहूचे प्रतीक मानले जाते. स्वयंपाकघरातील मीठ संपल्यानंतर राहुची नजर घरावर पडते. कामं बिघडतात, आर्थिक संकटे (Financial Problems) निर्माण होतात. तसेच, मीठ दुसऱ्याच्या घरी कधीच मागू नये. अशी मान्यता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.