Goat Milk Health Benefits: गोवर आजारावर बकरीचे दूध गुणकारी

Goat's Milk: बकरीच्या दूधामुळे मानसिक आरोग्य सुधारते.
Goat's Milk
Goat's Milk Dainik Gomantak

Goat's Milk: उत्तम आरोग्यासाठी दूध प्यावं. दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. शरीराची कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यासाठी दूध आवश्यक असते. त्यामुळे लोकं गाई आणि म्हशीच्या दुधाचा वापर आहारात करतात. अनेक विक्रेते गाई आणि म्हशीच्या दूधाचा वापर मिठाई बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात. पण गाई आणि म्हशीच्या दुधाप्रमाणेच बकरीचे दूध पण शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे आहारात या दूधाचा समावेश जरुर करावा.

Goat
Goat Dainik Gomantak

काही लोक बकरीच्या दूधाचा वापर रोजच्या आहारात करतात. बकरीच्या दूधाचे असंख्य फायदे आहेत. या दूधामुळे मानसिक आरोग्य (Mental Health) सुधारते. मानसिक संतुलन चांगले राखण्यास मदत होते. पण हे दूध सर्वांनाच पचत नाही.

आहार तज्ञ सांगतात की, बकरीचे दूध इम्युन सिस्टीम आणि मेटाबॉलिजम वाढवते. डेंग्यु रुग्णांसाठी पण हे दूध खूप लाभदायी आहे. इतर दूधांच्या तुलनेत बकरीचे दूध घट्ट असते.

Goat's Milk
Normal Delivery Instead C-Section: सी-सेक्शनपेक्षा नॉर्मल डिलिव्हरी अधिक फायदेशीर आहे का? जाणून घ्या

तसेच, बकरीच्या दूधामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. तुम्हाला कसली सूज आली असेल तर ती कमी होते. हाडं मजबुत होतात. बकरीचे दूध प्यायल्यामुळे भीती, कोणत्या प्रकारची चिंता दूर होते. या दूधामध्ये भरपूर प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, फोस्फरस, मॅग्नेशियम ही पोषक तत्वे असतात. त्याचबरोबर बकरीचे दूध हे प्रोटीन, फायबर, फॅटचा चांगला सोर्स आहे.

बकरीच्या दूधामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन-ए असते. त्यामुळे याचे सेवन केल्याने मोतीबिंदू, कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. लहान मुलांना (Childrens) गोवर झाल्यावर डॉक्टर बकरीचे दूध आहारात घेण्याचा सल्ला देतात. या दूधात लोह पण आढळुन येते.

तसेच शरीरातील कॅलेस्ट्रॉल कमी होण्यास बकरी दूधामुळे मदत होते. बकरीच्या दूधाचे असे भरपूर फायदे शरीराला आहेत. त्यामुळे बकरीच्या दूधाचा समावेश आहारात आवश्यक करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com