छोटीशी स्ट्रॉबेरी ठरते पुरूषांसाठी मोठी फायदेशीर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

न्हाळ्याच्या काळात स्वत: ला निरोगी ठेवण्यासाठी फळं खाणं खूप चांगलं मानलं जातं. कारण फळं खाल्ल्यामुळे शरीरात भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते.  विशेषतः फळं उन्हाळ्यात खाणे आवश्यक आहे.

न्हाळ्याच्या काळात स्वत: ला निरोगी ठेवण्यासाठी फळं खाणं खूप चांगलं मानलं जातं. कारण फळं खाल्ल्यामुळे शरीरात भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते.  विशेषतः फळं उन्हाळ्यात खाणे आवश्यक आहे. पुरुष बहुतेक वेळेस घराबाहेर राहतात, त्यांना घाम व उष्णतेचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत त्यांना स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या काळात शरीरात पाण्याअभावी डिहायड्रेशन ची समस्या सामान्य आहे. अशा परिस्थितीत आपण दिवसभर पाणी आणि द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे.

द्रव्यांव्यतिरिक्त, अशी काही फळे आहेत जी शरीरात पाण्याची कमतरता देखील भरून काढते. आज एका फळांविषयी अशीच माहीती जाणून घेणार आहोत जे पुरुषांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येकाने उन्हाळ्यात चवदार स्ट्रॉबेरी फळ जरूर खावे.

शरीरात उर्जा निर्माण करते

उन्हाळ्याच्या कालावधीत शरीराला  तहान लागलेली असते पण खाण्यासारखे वाटत नाही, अशा परिस्थितीत एक पर्याय म्हणून स्ट्रॉबेरी उपलब्ध आहे. या फळाने पोट देखील भरते आणि आपल्या शरीराला पोषक द्रव देखील मिऴते.  पुरुषांना उन्हाळ्याच्या काळात स्ट्रॉबेरीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे आपण डिहायड्रेशनच्या समस्येपासून सुरक्षित राहतो. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यास शरीरात उर्जा कायम राहते. जे उन्हाळ्यात तुम्हाला ऊर्जावान ठेवते.

स्ट्रॉबेरीमुळे ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहते

स्ट्रॉबेरी खाल्ल्याने ब्लड शुगर लेवल नियंत्रित ठेवते. वैज्ञानिक अभ्यासामध्येही ही गोष्ट समोर आली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. म्हणूनच, उन्हाळ्यात पुरुषांना स्ट्रॉबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो. 

स्ट्रेस कमी होतो

जर तुम्हाला सतत टेंशन येत असेल तर तुम्ही शक्य तितक्या लवकर स्ट्रॉबेरी फळ खाणे सुरू केले पाहिजे. स्ट्रॉबेरीचे सेवन केल्यास आपला ताण कमी होतो. स्ट्रॉबेरीमध्ये ताण कमी करण्यासाठीचे विशेष तत्व असते. म्हणूनच, तणाव कमी करण्यासाठी पुरुषांनी स्ट्रॉबेरीचे सेवन केले पाहिजे. छोटीसी स्ट्रॉबेरी आपल्याला उन्हाळ्यात मोठी फायद्याची ठरू शकते.

पुरुषांसाठी फायदेशीर

स्ट्रॉबेरी खाण्याचे बरेच फायदे आहेत. विशेषत: पुरुषांसाठी एक चांगला फायदा होतो. स्ट्रॉबेरीमध्ये अफ्रोडायसिएक घटक असतो, जो लैंगिक उत्तेजन वाढविण्यास उपयुक्त ठरतो. याशिवाय स्ट्रॉबेरीचे सेवन हे नपुंसकतेसाठी फायदेशीरही मानले गेले आहे. नपुंसकत्व कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी किती उपयुक्त ठरू शकते यावर संशोधन केले जात आहे.

गरोदरपणात उपयुक्त 

महिलांना गरोदरपणात जास्त प्रमाणात जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमची आवश्यकता असते. विशेषतः स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात आढळणारे फोलेट (व्हिटॅमिन-बीचा एक प्रकार) घेणे फार महत्वाचे आहे. गरोदरपणात फोलेट उपयुक्त मानली जाते. पोषक त्तव न मिळाल्याने मुलाचा विकास न होणे, वजन कमी होणे, कुपोषण आणि नवजात संबंधित इतर समस्यांवर स्ट्रॉबेरी हा उत्तम उपाय आहे. शरीरातील सर्व पोषक तत्वांचा अभाव स्ट्रॉबेरी दुर करते.

एंटी-एजिंग

स्ट्रॉबेरी वृद्धत्व कमी करू शकते. वयानुसार कमी होत असलेली चेहर्‍याची चमक वाढविण्यात आणि सुरकुत्या कमी करण्यास  स्ट्रॉबेरी मदत करते.

छोटीशी लवंग पुरुषांसाठी या प्रकारे ठरू शकते फायदेशीर 

 

संबंधित बातम्या