Mobile Battery Tips: 'या' 8 चुका आहेत मोबाइल बॅटरी खराब होण्यामागचे कारण

अनेक वेळा आपण काही अशा चुका करतो ज्यामुळे फोनची बॅटरी खराब होते.तुम्हीही या चुका करत असाल तर आजच बंद करा.
Mobile Battery Tips
Mobile Battery TipsDainik Gomantak

Mobile Battery Tips: मोबाइलची बॅटरी लवकर खराब होऊ नये असे वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक लोक सारखी तक्रार करतात की मोबाइलची बॅटरी लवकर खराब होते. पण त्यांच्याच काही चुकामुळे असे होते. तुमच्याही मोबाइलची बॅटरी लवकर खराब होत असेल तर पुढे दिलेल्या गोष्टींची लक्षात ठेवा.

मोबाइलची बॅटरी खराब का होते?

  • मोबाइल गरम होणे

मोबाइल वापरताना गरम होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फोन जास्त गरम झाल्यास लगेच बाजूला ठेवा. असे न केल्यास मोबाइलची बॅटरी लवकर खराब होऊ शकते.

  • मोबाइची कव्हर

मोबाइलला नेहमी हलकी कव्हर वापरावी. कारण चार्जिंग दरम्यान निर्माण होणारी उष्णता बाहेर पडू शकते. यामुळे फोनची बॅटरी चांगली राहते.

  • गरज नसताना अॅप सुरू ठेवणे

अनेक लोक मोबाइलवर गरज नसतांना अॅप सुरू ठेवतात. यामुळे बॅटरी लवकर उतरते. यामुळे मोबाइल सारखे चार्ज करावे लागते आणि मोबाइल बॅचरी खराब होऊ शकते.

  • वाय-फाय,ब्लूटूथ ऑन ठेवणे

मोबाइलमध्ये वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ गरज नसताना ऑन ठेवू नका. यामुळे मोबाइलची बॅटरी लवकर संपते. तसेच तुम्हाला मोबाइल सारखा चार्जिंगवर ठेवावा लागतो.

Mobile Battery Tips
Vastu Tips For Rented Home: घर भाड्याने घेत आहात? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं
  • रात्रभर चार्जिंगला ठेवणे

तुम्ही तुमचा मोबाइल रात्रभर चार्जिंगला ठेवणे टाळावे. असे केल्याने मोबाइलची बॅटरी खराब होऊ शकते. असे अनेक मोबाइल आहेत जे ऑटो कट फीचरसह येत नाहीत. अशावेळी फोनची बॅटरी ओव्हरचार्जिंगमुळे खराब होऊ शकते.

  • चार्जिंगला असताना वापर

जर तुम्हाला मोबाइल चार्ज करताना वापरायची सवय असेल तर तुम्हाला तुमची सवय बदलावी लागेल. चार्जिंग करताना मोबाइल वापरल्याने मोबाइलची बॅटरी खराब होऊ शकते. तसेच बॅकअप देखील कमी होऊ शकतो.

  • मोबाइल बॅटरी पुर्ण संपवणे

मोबाइल चार्ज करण्यासाठी तुम्ही त्याची बॅटरी पूर्णपणे संपेपर्यंत वाट पाहू नका. जेव्हा मोबाइलची बॅटरी 10 किंवा 15 टक्के राहते, तेव्हा मोबाइल चार्जिंगला लावावा. यामुळे बॅटरी खराब होणार नाही.

  • दुसऱ्या मोबाइलचे चार्जर वापरणे

मोबाइलची बॅटरी दुसऱ्या चार्जरने कधीही चार्ज करू नका. कारण मोबाइल नेहमी त्याच्या ऑरिजनल चार्जरनेच चार्ज करावा. यामुळे मोबाइलची बॅटरी लवकर खराब होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com