Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार

वातावरणातील बदलामुळे आपल्या शरीरात (body) देखील बदल (Changes) होतात.
Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार
Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार Dainik Gomantak

आजकाल दैनंदिन जीवन धावपळीचे आणि तणावपूर्ण झाले आहे. यामुळे स्वत: च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे वजनात वाढ होताना दिसत आहे. सध्या मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे अशा वातावरणात (Atmosphere) आपल्या आहारात तसेच व्यायामत कोणता बदल करावा हे समजून घ्यायला हवे. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर (Health) होतो. तसेच वजन कमी करण्यास कोणती मदत मिळू शकते याबद्दल माहिती करून घेऊ.

Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार
Health Tips: फळे खाल्यानंतर घ्यावी ही काळजी-

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ऋतुनुसार खाणे , पिणे , झोपणे , व्यायाम करणे याबाबत माहिती दिली आहे. कारण वातावरणातील बदलामुळे आपल्या शरीरात देखील बदल होतात. पावसाळ्यात (Monsoon) अनेक लोकांना वाताचा त्रास होतो. तसेच पित्ताचा देखील त्रास उद्भवतो. या बदलामुळे स्थूल लोकांमध्ये गुडगेदुखी, पायाची टाच दुखणे किंवा गॅस , पचनसंस्थेच्या समस्याना तोंड द्यावे लागते. कारण या वातावरणात पचनक्रिया मंद झालेली असते. यामुळेच पचायला हलका आहार घ्याव. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील बऱ्याच आजारांपासून सुटका मिळून शरीर उत्साही राहते.

Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार
Health Tips - अर्धा तास पायी चालण्याचे "हे" आहेत फायदे

कोणता आहार घ्यावा -

पावसाळ्यात (Monsoon) नियमितपणे पाणी उकळून थंड करून प्यावे. दिवसभर कोमट पाण्याचे सेवन केले तर उत्तमच आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. जेवणानंतर लगेच पाणी ना पिता अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे. जेवण करतांना थोडे थोडे पाणी प्यावे ,परंतु एकदम पोटभर पाणी पिणे टाळावे. कारण जेवण केल्यानंतर लगेच पाणी प्यायलयास वजनात वाढ होऊ शकते.

आरोग्य तज्ञानुसार, गोड पदार्थ, आंबट, यासारख्या गुणांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यास लाभदायी असते. केवळ स्थुल लोकांनी गोड पदार्थ खाणे टाळावे. यात साखर , पेढा , दुधापासून बनवलेले पदार्थ यासारखे पदार्थ खाणे टाळावे.

Monsoon Health Care : वजन कमी करण्यासाठी घ्या 'असा' आहार
Health Tips: उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ तुम्ही खात असाल तर सावधान!

दुपारच्या जेवणात फुलके किंवा ज्वारीची भाकरी खावी. यासोबत दूध,भेंडी, दोडका, हिरवे मुग, अशा भाज्यांचे सेवन करावे. तसेच पुदिना चटणी, काकडी-टोमॅटोची कोशिंबीर तांदूळ भाजून घेतलेला भात , थोड्या प्रमाणात असे जेवण घ्यावे. यात मधुमेह असलेल्या लोकांनाई भाताचे सेवन करणे टाळावे. जेवणानंतर ताक पिणे नेहमीच लाभदायी असते. यात काळे मीठ आणि काळी मिरपूड घालून घ्यावे. रात्रीचे जेवण 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान घ्यावे. याचे कारण म्हणजे सूर्यास्तानंतर पचनक्रिया मंदावते. यावेळी जेवणात सूप घेणे लाभदायी ठरू शकते.

दुधी भोपल्याचा सूप घेतल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते . जर अधेमधे भूक लागलीच तर तुम्ही राजगीर लाही सारख्या पदार्थांचे सेवन करू शकता. तसेच संत्रे, मोसंबी ,डालिंब यासारख्या फळांचे सेवन देखील करू शकता. रात्री जास्त वेळ जागरण करणे टाळावे. असे केल्यास शरीरास फायदा होतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com