Morning Blues: सकाळी झोपेतून उठताना कंटाळा येतो,जाणून घ्या कारणे

झोपण्यापूर्वी मद्यपान करू नये.
Morning Blues: सकाळी झोपेतून उठतांना कंटाळा येतो,जाणून घ्या कारणे
Morning Blues: सकाळी झोपेतून उठतांना कंटाळा येतो,जाणून घ्या कारणे Dainik Gomantak

अनेक लोकांना झोपेच्या समस्या असतात. अनेक लोक सकाळी झोपेतून उठताना कंटाळा करतात असे एका संशोधनातुन समोर आले आहे. याचे अनेक कारण असू शकते. पण समस्येवर उपाय देखील आहेत. तुम्हाला सकाळी उठताना थकल्यासारखे का वाटते जाणून घेवूया याची प्रमुख कारणे.

* झोपताना मद्यपान करणे

तुम्हाला झोपण्यापूर्वी मद्यपान करण्याची सवय आहे का? जर असेल तर तुम्हाला सकाळी उठताना थकल्यासारखे वाटण्याचे एक कारण असू शकते. संशोधनानुसार असे सांगण्यात आले की झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यास झोप अपूर्ण होऊ शकते. यामुळे डोळ्यात जळजळ होणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढू शकते. यामुळे झोपण्यापूर्वी मद्यपान करणे टाळावे.

Dainik Gomantak

* झोपण्यापूर्वी खाणे

अनेकांना रात्री झोपताना चटपटीत किंवा चॉकलेट खाण्याची सवय असते. तुम्हाला जर निरोगी आरोग्य ठेवायचे असेल तर झोपेच्या 2 ते 3 तास आधी काहीच खाऊ नये. कारण असे केल्यास झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला थकल्यासारखे वाटू शकते. जर तुम्हाला गोड पदार्थ खाल्याशिवाय झोप येत नसेल तर झोपेच्या 1 ते 2 तास आधी खावे.

Dainik Gomantak
Morning Blues: सकाळी झोपेतून उठतांना कंटाळा येतो,जाणून घ्या कारणे
या Healthy Habits तुम्ही फॉलो करता का?

* अपूर्ण झोप

निरोगी आरोग्यासाठी माणसाला 7 ते 8 तासाची झोप आवश्यक असते. अनेकजन कमी झोप घेवून सुद्धा दुसऱ्या दिवशी फ्रेश दिसतात. पण अनेकांना कमी झोपल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी थकल्यासारखे वाटते.

Dainik Gomantak

* अतिझोप

झोपेच्या अनेकांना समस्या असतात. यात अति झोप घेणे किंवा कमी झोप घेणे यासारख्या समस्या अनेकांना असतात. पण अतिझोप घेतल्यास दुसऱ्या दिवशी आपल्याला थकल्यासारखे वाटू शकते. तर अनेकांना डोके दुखीची समस्या निर्माण होऊ शकते.

Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com